घरताज्या घडामोडीLive Update: नागपुरात आज ३ हजार ६१४ नव्या रुग्णांची नोंद, ३२ जणांचा...

Live Update: नागपुरात आज ३ हजार ६१४ नव्या रुग्णांची नोंद, ३२ जणांचा मृत्यू

Subscribe

नागपूरात आज ३ हजार ६१४ नव्या रुग्णांची नोंड झाली असून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ हजार ८५९ रुग्ण बरे होऊन आज घरी गेले आहेत. त्यामुळे आता नागपूरातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ९३ हजार ८०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ हजार ६२४ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख ५९ हजार १०८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विनायक शिंदे आणि नरेश गोर या आरोपींना आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.


पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस नेतेही दाखल, शरद पवारांच्या भेटीसाठी काँग्रेस नेते कमलनाथ पोहचले, दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक

- Advertisement -

आज संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील दिल्लीत दाखल झाले आहेत.


लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांना उपचारकरता एन्समध्ये दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.


”ही वसुली कोणासाठी सुरु होती? शरद पवार आणि उद्धव ठाकरे उत्तर द्या”

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज पत्रकार परिषद घेत परमबीर सिंह यांच्या चिठ्ठी प्रकरणावर भाष्य करत महाविकास आघडी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सचिन वाझे कोणाच्या दबावाखाली होते. शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की मग शरद पवार असा सवाल करत गृहमंत्री कोणासाठी वसुली करत होते स्वत:साठी की सरकारसाठी असा सवाल करत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.


परमबीर सिंग यांचे पत्र, हे भाजपचेच षडयंत्र- हसन मुश्रीफ

सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुरते ढवळून निघाले असून मुंबई होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर तर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांची खेळी सुरू झाली असून “हे भाजपचेच षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केल्याने या प्रकरणातील गूढ अजूनच वाढलं आहे.

आरोपींना आज न्यायालयात केले जाणार हजर

स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एटीएसने दोन जणांना अटक केली आहे. या दोघांना आज दुपारी ठाण्याच्या सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात एटीएसची पहिली अटक असून आणखी काही पोलीस अधिकारी एटीएसच्या रडारवर असल्याचे एटीएसच्या सूत्राकडून समजते. अटक केलेल्या या दोघांपैकी एक जण बडतर्फ पोलीस शिपाई असून दुसरा क्रिकेटबुकी आहे.


परमबीर सिंग यांच्या ई-मेलबाबत शंका, काँग्रेसची प्रतिक्रिया

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि नवनियुक्त होमगार्ड प्रमुख परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. गृहमंत्र्यांनी दर महिना १०० कोटी रुपयांची मागणी केली असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात केला आहे. याच प्रकरणावरून ठाकरे सरकारविरुद्ध विरोधी पक्ष असा वाद रंगू लागला आहे. यातच राज्यासह केंद्रातील भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगले कोंडीत पडकले आहे. परंतु या प्रकरणावर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी मौन बाळगले आहे. तर काही मंत्री सावध भूमिका मांडत आहेत.


गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय़ सोमवारी – शरद पवार

मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी आपले पद गेल्यावरच आरोप का केले ? असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रविवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांना पदावर असताना या प्रकरणावर का बोलावस वाटल नाही ? मुंबई पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी झाल्यानंतरच त्यांना हे आरोप करावेसे का वाटले ? असा सवालही पवारांनी केला. वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना पोलिस सेवेत परमबीर सिंह यांनीच आणले, त्यामध्ये मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा कोणताही सहभाग नव्हता, असे सांगत त्यांनी या प्रकरणात सरकारलाही क्लिन चिट दिली. राज्य सरकारला या संपुर्ण प्रकरणात कोणताही धोका नसल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणात परमबीर सिंह यांची चौकशी करण्याचा पर्याय पवारांनी सुचवला आहे. गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपाच्या विषयावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राहिलेल्या जुलिओ रिबेरो यांच्या अध्यक्षतेत चौकशी करण्याचा पर्याय पवार यांनी सुचवला आहे. त्यामध्ये अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा पर्यायही विचारात असल्याचे त्यांनी सांगितले. पण अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री आणि पक्षात चर्चा करून होईल असेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्राने चौकशी केली तर फटाक्यांची माळच लागेल

‘एका पोलीस आयुक्तांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर असा आरोप केला आहे की, गृहमंत्री दरमहिन्याला १०० कोटी आले पाहिजे, असे सांगतात. अशी घटना राज्याच्या नाहीतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असेल. जर दरमहिन्याला १०० कोटींची मागणी गेल्या वर्षापासून केली असेल तर आतापर्यंत १२०० कोटी मिळाले पाहिजे होते. तसेच राज्यात शहर किती त्यांचे आयुक्त किती? आतापर्यंत किती रक्कम मिळाली. या सर्व गोष्टींची चौकशी होण गरजेचे आहे. विशेष म्हणजे गृहमंत्र्यांवर करण्यात आलेल्या आरोपानंतर गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. तसेच याप्रकरणी केंद्राने चौकशी करावी, केंद्राने जर चौकशी केली तर अक्षरश: फटाक्यांची माळ लागले’, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर केला.


एटीएसकडून मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील एक जण पोलीस शिपाई आणि क्रिकेट बुकीचा समावेश आहे.


राज ठाकरे अनिल देशमुखांवर बोलणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ११.३० वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. अनिल देशमुख यांच्यावर कोणते आरोप करणार हे पाहावे लागणार आहे.


केवळ राजीनामा नको, चौकशी करा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप केले आहे, याप्रकरणी केवळ राजीनामा नको, तर त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.


लेटरबॉम्ब प्रकरणी पवारांनी दिल्लीत बोलावली बैठक

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप केले आहे, या आरोपाबाबत आज दिल्लीत बैठक होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. आज, रविवारी सायंकाळी ५ ते ७ या दरम्यान ही बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील सहभागी असणार आहेत. या बैठकीत लेटरबॉम्ब प्रकरणी चर्चा होणार असून गृहमंत्र्यांबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


सरकारवर नक्कीच शिंतोडे उडाले आहेत

‘विरोधी पक्षाने मागणी केली म्हणून सरकार चालत नाही किंवा सरकारमध्ये उलथापालथ होत नाही. गेल्या ७२ तासामध्ये एका पत्रामुळे आणि पोलीसामुळे सरकारवर नक्कीच शिंतोडे उडाले आहेत, हे मान्य करण्याचा मोठेपणा माझ्याकडे आहे. कारण मी त्या सरकारचा चाराण्याचा चहाचा ओशाळलेला नाही आहे. सरकारवर उडालेले शिंतोडे कसे धुऊन काढायचे आणि स्वच्छ प्रतिमेने कसे बाहेर आले पाहिजे. या संदर्भात सर्वांनी एकत्र बसून निर्णय घेतला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने आपले पाय जमिनीवर आहेत की नाही, हे पाहायला हवे’, असे म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या सत्तेत असणाऱ्या व्यक्तींवरच हल्लाबोल केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -