घरCORONA UPDATECovid19 Vaccine: लसीकरणात महाराष्ट्र देशात ठरला अव्वल !

Covid19 Vaccine: लसीकरणात महाराष्ट्र देशात ठरला अव्वल !

Subscribe

राज्यातील पुरुषांनी लसीकरणात बाजी मारली आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १ कोटी ५० लाख ४६ हजार ५५९ नागरिकांचे सर्वाधिक लसीकरण पूर्ण झाले आहे. राज्यातील मुंबई, ठाणे शहरात सर्वात जास्त लसीकरण प्रक्रिया पार पडलीय

महाराष्ट्र राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेला चांगलाच वेग आला. राज्यातील राज्यातील १ कोटी नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहे.  महाराष्ट्र राज्य सर्वाधिक लसीकरण करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.  (Covid19 Vaccine: 1 crore people in Maharashtra state took both doses of vaccine, Maharashtra became the most vaccinated state in india)  गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात लसीकरण मोहिमने वेग घेतला होता. मोठ्या प्रमाणात लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांवर भर दिला जात होता. अशाप्रकारे राज्याच्या या लसीकरण मोहिमेला यश आले असून राज्यातील तब्बल १ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. राज्यात शासकीय आणि खासगी अशा दोन्ही पद्धतीने लसीकरण मोहिम राबवण्यात येत असून राज्यात ३ हजार ७०७ शासकीय लसीकरण केंद्र आहेत तर ४४३ खासगी लसीकरण केंद्र आहेत.

- Advertisement -

राज्यातील एकूण लसीकरण

राज्यात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ही १ कोटी ९३ हजार ९१ इतकी आहे. तर लसीचा एक डोस घेतल्यांची संख्या ३ कोटी १६ लाख ५४ हजार ७८९ इतकी आहे. त्याचप्रमाणे राज्यात गेल्या २४ तासात ४ लाख १५ हजार ५५२ लोकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. राज्यातील आतापर्यंत एकूण लसीकरणाचा विचार केला असता राज्यात लसीचे एक आणि दोन्ही लस घेतलेल्यांची एकूण संख्या ४ कोटी १७ लाख ४७ हजार ८८० इतकी आहे.

पुरुषांची लसीकरणात बाजी

राज्यातील पुरुषांनी लसीकरणात बाजी मारली आहे. राज्यात लसीकरण करण्यात पुरुषांची संख्या अधिक आहे. राज्यात आतापर्यंत २ कोटी २६ लाख ४६ हजार ५१ इतक्या पुरुषांनी लसीकरण केले आहे. तर महिलांचा विचार केला असता लसीकरणात महिलांची संख्या कमी आहे. राज्यात आतापर्यंत १ कोटी ९० लाख ९५ हजार १२० महिलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

- Advertisement -

 

कोव्हिशिल्ड लसीचा सर्वाधिक पसंती

राज्यात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि नव्याने समावेश झालेल्या स्पुतनिक व्ही लसीचा समावेश आहे. या तीन लसी राज्यातील नागरिकांना देण्यात येत असून कोव्हिशिल्ड लसीला नागरिकांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला आहे. त्यानंतर स्पुतनिक व्ही लस घेण्यात नागरिकांचा कल दिसून येत आहे. आतापर्यंत राज्यातील ३ कोटी ६७ लाख ८८ हजार ५७६ नागरिकांनी कोव्हिशिल्ड लस घेतली आहे तर ४८ लाख ९५ हजार ९५ लोकांनी स्पुतनिक लस घेण्यास प्राधान्य दिले आहे.

 

१८ ते ४४ वयोगटात सर्वाधिक लसीकरण

राज्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लसीकरण मोहिमेला भरभरुन प्रतिसाद दिला असून राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १ कोटी ५० लाख ४६ हजार ५५९ नागरिकांचे सर्वाधिक लसीकरण केले आहे. त्यानंतर ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांचा लसीकरणात दुसरा क्रमांक आहे तर ६० वर्षाहून अधिक नागरिकांचा तिसरा क्रमांक आहे.

 

मुंबई, पुणे,ठाण्यात सर्वाधिक लसीकरण

राज्यातील मुंबई, ठाणे शहरात सर्वात जास्त लसीकरण प्रक्रिया पार पडलीय. मुंबईत आतापर्यंत ७० लाख ३५ हजार ७४७ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेय. मुंबईनंतर पुण्यात ५९ लाख ७५ हजार ६९८ नागरिकांचे लसीकरण तर ठाण्यात ३२ लाख ७१ हजार २४८ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत. तर हिंगोली त्यानंतर गडचिरोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुलनेने कमी लसीकरण झाले आहे.

शहरी भागात लसीकरणाला जास्त प्राधान्य

राज्यात शहरी भागातील नागरिकांनी लसीकरणाला सर्वाधिक प्राधान्य दिल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागातही लसीकरणासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती मात्र तुलनेने ग्रामीण भागातील नागरिकांनी लसीकरणाला कमी प्रतिसाद दिला आहे.

 


हेही वाचा – covid19: तिसऱ्या लाटेला थोपण्यासाठी Vaccination पुरेसे नाही, आरोग्य तज्ञांचा अलर्ट

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -