घरCORONA UPDATEपुणेकरांसाठी लॅबमधील कर्मचारी घरी येऊन करणार रक्त तपासणी!

पुणेकरांसाठी लॅबमधील कर्मचारी घरी येऊन करणार रक्त तपासणी!

Subscribe

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे अनेक लोक रक्त चाचणीसाठी घराबाहेर पडण्यास घाबरतात. अशा रूग्णांना घरबसल्या वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी पुणे अपोलो डायग्नोटिस्क या प्रयोगशाळेनं पुढाकार घेतलाय. या लॅबमधील कर्मचारी घरोघरी जाऊन रूग्णांच्या रक्ताचे नमूने घेत आहेत. जेणेकरून रूग्णाला कुठेही बाहेर न जाता घरच्या घरी रक्त चाचणीची सुविधा मिळू शकेल.

मुंबईप्रमाणेच राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. या रूग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिकेने पुन्हा लॉकडाऊन केला असून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार कमी होण्यास मदत करण्यासाठी अनेक लोक जुन्या किंवा चालू असलेल्या वैद्यकीय उपचारांकरिता रूग्णालयात जाण्याऐवजी लोक घरीचरहाणं पसंत करत आहेत.

- Advertisement -

अपोलो डायग्नोस्टिक या प्रयोगशाळेनं एक अनोखा उपक्रम सुरू केलायं. याद्वारे पुण्यात घरोघरी जाऊन रूग्णांची रक्तचाचणी केली जात आहे. स्ट्रोक, हृदयविकार, मधुमेह आणि रक्तदाबाची समस्या असणाऱ्या नागरिकांना नियमित रक्ताची चाचणी करावी लागते. वेळीच निदान व उपचार न मिळाल्यास गंभीर परिस्थितीत ओढावू शकते. या सर्व बाबींचा विचार करून रूग्णांची रक्तचाचणी घरबसल्या करण्याचा निर्णय अपोलो डायग्नोस्टिक लॅबनं घेतला आहे.


हे ही वाचा – Instagram वरून लागला अपहरण झालेल्या मुलीचा शोध!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -