घरताज्या घडामोडीवाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अदर पूनावलांचे मोठे विधान; म्हणाले...

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अदर पूनावलांचे मोठे विधान; म्हणाले…

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांसह मृतांचाही आकडा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांसह मृतांचाही आकडा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटने कोविशिल्ड लशीच्या उत्पादनाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (Covishield Serum Institute Adar Poonawala Coronavirus Mumbai Maharashtra India)

पत्रकारांशी बोलताना सिरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितले की, “आमच्याकडे सध्या ५ ते ६ मिलियन अर्थात ६० लाख कोविशिल्ड डोसचा स्टॉक तयार आहे. पण या डोसना सध्या रुग्णालयांकडून शून्य मागणी आहे. सध्याचा कोरोनाचा व्हेरियंट हा सौम्य असून त्याचं गंभीर परिणाम नाहीत. पण तरीही खबरदारी म्हणून ज्येष्ठ नागरिक बूस्टर डोस घेऊ शकतात”, असे म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, मागील काही दिवसांपासून वाढत असलेली देशभरातील कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या काहीशी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या २४ तसात ११ हजार ६९२ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, शुक्रवारी १२ हजार ५९१ रुग्ण आढळून आले होते. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, देशात सध्या ६६ हजार १७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोविडमुळे मृतांची संख्या 42 आहे.

यासह एकूण मृतांचा आकडा 5 लाख 31 हजार 300 वर गेला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या दहा रुग्ण केरळमधील आहेत. कोविडच्या एकूण रुग्णांची संख्या 4,48,81,877 वर पोहोचली आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, सक्रिय प्रकरणांची एकूण संख्या एकूण केसलोडच्या फक्त 0.15% आहे, तर राष्ट्रीय कोविड पुनर्प्राप्ती दर 98.66 टक्के आहे.

व्हायरसपासून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,42,83,021 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के आहे. याशिवाय, वेबसाइटने अहवाल दिला आहे की देशभरातील लोकांना लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.


हेही वाचा – दगड मारुन सभा बंद करणारे आम्ही राऊतांनी नादाला लागू नये; गुलाबराव पाटलांचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -