नायगाव स्थानकात क्रेनची लोकलला धडक, मोटरमन जखमी

पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्थानकात लोकलचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात या अपघातात मोटरमन जखमी झाला असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे.

पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्थानकात लोकलचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात या अपघातात मोटरमन जखमी झाला असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे. या अपघातानंतर पश्चिम रेल्वे प्रशासन आणि पोलीस घटनेचा अधिक तपास तपास करत आहे. (Crane collides with local at Naigaon station motorman injured western railway line)

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास लिफ्टचे काम करण्यात येणार होते. हे स्टीलचे खांब उभारण्यासाठी ब्लॉकचे नियोजन करण्यात आले होते. या कामासाठी रुळाला समांतर काही अंतरावर क्रेन उभी करण्यात आली होती. ब्लॉक घेऊन हे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी अचानक रुळाजवळच उभ्या असलेल्या तृतीयपंथीयाने क्रेनवर जोरदार दगफेक केली. त्यामुळे चालकाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्याला क्रेन नियंत्रित करता आली नाही.

त्यावेळी मध्यरात्री ००.५५ वाजता एक उपनगरीय विरार लोकल डाऊन दिशेला येऊन नायगाव स्थानकात प्रवेश करत असताना क्रेनचे हुक लोकलच्या काचेला लागले. त्यामुळे लोकलची पुढील काचा फुटल्या आणि मोटरमनच्या डोक्याला मार लागला. दरम्यान, मोटरमनला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. या घटनेनंतर लोकल रिकामी करून विरार कारशेडमध्ये नेण्यात आली.

नायगाव स्थानकाजवळ रुळाच्या शेजारी तृतीयपंथीय बेकायदेशीर कृत्य करीत असून रेल्वेच्या कामाला विरोध की अन्य काही कारणामुळे दगडफेक झाली याचा तपास पश्चिम रेल्वे आणि रेल्वे पोलीस करीत आहेत.


हेही वाचा – विजयाची नाही, आंदोलनाची रॅली काढणार; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शुभांगी पाटलांचा झंझावात