घर क्राइम Crime News : पुण्यापाठोपाठ जळगाव गुन्हेगारीचे केंद्र? किरकोळ वादातून तरुणाचा गोळीबार

Crime News : पुण्यापाठोपाठ जळगाव गुन्हेगारीचे केंद्र? किरकोळ वादातून तरुणाचा गोळीबार

Subscribe

मागील काही महिन्यात राज्यातील काही जिल्हे हे गुन्हेगारीचे केंद्र बनत चालले असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या तीन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

जळगाव : हल्ली किरकोळ कारणावरून हत्या, मारहाण आणि विविध गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून प्रश्न उपस्थित करण्यात येत. पण गेल्या काही महिन्यात राज्यातील काही जिल्हे हे गुन्हेगारीचे केंद्र बनत चालले असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जायचे पण आता गुन्हेगारीचे ठिकाण म्हणून सुद्धा पुण्याची ओळख झालेली आहे. पुण्यापाठोपाठ नाशिक आणि जळगाव हे सुद्धा गुन्हेगारीचे ठिकाण म्हणून समोर येत आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या तीन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. (Crime News Firing on youth in Jalgaon district )

हेही वाचा – पत्रकार मारहाण प्रकरण : किशोर पाटलांवर कारवाई करण्याची पत्रकार संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील MIDCच्या व्ही-सेक्टर येथील प्रभा पॉलिमर कंपनीच्या मेन गेटवर एका तरुणाकडून दुसऱ्या तरुणावर गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या घटनेत तरुण बचावला आहे. या घटनेचा संपूर्ण थरार हा सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वप्नील ऊर्फ सोपान चांदुसिंग मोरे (वय वर्ष 25, रा. कुसूंबा, ता. जळगाव) संशयीताला ताब्यात घेतले आहे. या स्वप्नीलने आकाश तंवर (वय वर्ष, 24) याच्यावर गोळीबार केला. सलग दोन वेळा गोळी झाडल्यानंतर तिसरी गोळी पिस्तुलातच अडकल्याने आकाश तंवर हा या घटनेत थोडक्यात बचावला.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश तंवर याचा मित्र संतोष कोळी यांची स्वप्नील सोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याने संतोष कोळी याने स्वप्नीलच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी केले. ज्यानंतर याच रागामुळे काही दिवसांनी स्वप्नीलने त्या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. गुरुवारी (ता. 10 ऑगस्ट) सकाळी 11 वाजताच्या सुमारास आकाश तंवर हा कामावर गेला होता. यावेळी तो आपल्या मित्रांसोबत कंपनीच्या बाहेर गप्पा मारत बसला होता.

- Advertisement -

यावेळी स्वप्नील त्या ठिकाणी आला आणि आकाशला शिवीगाळ करू लागला. तुझा मित्र बब्या कुठे आहे. आज तुझा आणि त्याचाही गेम करतो. असे म्हणत थेट कंबरेतून पिस्तूल काढून आकाशवर रोखली आणि काही कळण्याच्या आतच गोळीबार केला, अशी माहिती आकाशने फिर्यादीत दिली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच जळगावच्या अपर पोलीस अधिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्यानंतर या प्रकरणी मन्यारखेडा शिवारातून पळ काढणाऱ्या स्वप्नील मोरे याला ताब्यात घेतले.

स्वप्नील मोरेकडून पोलिसांनी गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस आणि दोन पितळी पुंगळ्या जप्त केल्या आहेत. त्याने तीन दिवसांपूर्वीच 16 हजार रूपयांत गावठी कट्टा आणि तीन काडतूस खरेदी केले होते, अशी माहिती प्राथमीक चौकशीत मिळाली आहे. त्याला न्यायालयातून पोलीस कोठडीत घेतल्यावर अधीक चौकशी केली जाणार असल्याचे निरीक्षक जयपाल हिरे म्हणाले.

जळगावात 15 दिवसांत तीन गुन्हे

जळगाव जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांत तीन गुन्हेगारीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 30 जुलैला जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. गावातच राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा खून करुन तिचा मृतदेह गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवून ठेवण्यात आल्याने खळबळ उडाली. मृत मुलीच्या शेजारी राहणाऱ्या 19 वर्षीय स्वप्नील पाटीलनेच हा गुन्हा केला होता. यानंतर काल जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना तिघांनी भर रस्त्यात अडवून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटिल यांच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -