Eco friendly bappa Competition
घर क्राइम Crime News : अल्पवयीन प्रेयसीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला अटक; वाचा सविस्तर प्रकरण...

Crime News : अल्पवयीन प्रेयसीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला अटक; वाचा सविस्तर प्रकरण…

Subscribe

कल्याण येथे रेल्वेमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी 48 तासांमध्ये छडा लावून या प्रकरणातील तरुणाला म्हणजेच अल्पवयीन मुलीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कल्याण : गेल्या काही महिन्यात राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः मुलींच्याबाबत गुन्हेगारीच्या घटना घडत असून राज्यातील मुली असुरक्षित असल्याचे वारंवार सांगण्यात येते. यातच आता कल्याण येथे रेल्वेमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी 48 तासांमध्ये छडा लावून या प्रकरणातील तरुणाला म्हणजेच अल्पवयीन मुलीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुणाल रविंद्र रातांबे (वय वर्षे 23) असे आरोपी प्रियकराचे नाव असून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुलीला पालकांच्या ताब्यात दिले आहे. (Crime News : Young man arrested for kidnapping minor girlfriend)

हेही वाचा – Bus Accident : भाविकाना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू तर 28 गंभीर जखमी

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मुलगी आणि तिचा प्रियकर कुणाल यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर हे प्रेमात झाले. मुलगी ही मुंबईतील धारावी येथे राहणारी असून आरोपी तरुण हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात राहणारा आहे. 19 ऑगस्टला सदर मुलगी ही तिच्या कुटुंबासोबत गदक एक्सप्रेसने प्रवास करत होती. त्यावेळी सोलापूरवरून आलेली ही एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात आल्यानंतर काही वेळातच ही मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या पालकांना मिळाली.

मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या पालकांना मिळताच तिच्या पालकांनी याबाबत कल्याण लोहमार्ग पोलिसांना कळवले. या घटनेची माहिती मिळताच कल्याण लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांनी कर्जत आणि कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. यावेळी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात एक्सप्रेसमधून खाली उतरुन जाताना दिसली. ज्यानंतर पोलिसांनी तत्काळ तिच्या मोबाईलचे लाईव्ह लोकेशन तपासले असता, ती कर्जत तालुक्यातील प्रियकर कुणालच्या घरी असल्याची माहिती मिळाली. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कुणालचे घर गाठले. त्यानंतर त्याच्या घरातून पीडित मुलीसह त्याला ताब्यात घेऊन कल्याणमध्ये आणले.

- Advertisement -

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुणालला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाची त्याच्याकडे कसून चौकशी केली. यावेळी त्याने काही महिन्यांपूर्वी त्यांची मैत्री ही इन्स्टाग्रामवर झाल्याची माहिती पोलिसांना देऊन घडलेला प्रकार सांगितला. तसेच, त्यानेच तिचे अपहरण केल्याची माहिती देखील पोलिसांना दिली. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दोघांना दिले. पोलिसांनी सदर मुलीला कुटुंबाकडे सुपूर्द केले असून तरुणाविरोधात कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -