घरक्राइमदेशभरातील गुन्हेगारीत मोठी वाढ; एनसीआरबीकडून आकडेवारी जाहीर

देशभरातील गुन्हेगारीत मोठी वाढ; एनसीआरबीकडून आकडेवारी जाहीर

Subscribe

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. संपूर्ण देशभरातच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा केला जातो आहे. भारताला 75 वर्षे झाली असली, तरी अद्याप गुन्हेगारी कमी झालेली नाही.

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. संपूर्ण देशभरातच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा केला जातो आहे. भारताला 75 वर्षे झाली असली, तरी अद्याप गुन्हेगारी कमी झालेली नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. (crime rate increased in India NCRB Data of Crime in 2021)

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो (एनसीआरबी) ही केंद्र सरकारचीच एजन्सी आहे. नुकताच एनसीआरबीने 2021 चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, गतवर्षी देशभरात 60.96 लाख गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले होते.

- Advertisement -

दरम्यान, दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी 36.63 लाख खटले भारतीय दंड संहिता अंतर्गत नोंदवल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये सुमारे 8 टक्के गुन्ह्यांची नोंद कमी झाली होती. देशभरात 2021 मध्ये 29 हजार 272 हत्येचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये दररोज 80 खून झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

2020 च्या तुलनेत हा आकडा 0.3 टक्क्यांनी जास्त आहे. 2020 मध्ये खुनाचे 29 हजार 193 गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गतवर्षी या वादातून 9 हजार 765 खून झाले होते.

- Advertisement -

वैयक्तिक वैमनस्यातून 3 हजार 782 खून झाले आहेत. दरम्यान, 2021 मध्ये महिलांबाबतच्या 4.28 लाखांहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर बलात्काराचे 31 हजार 677 गुन्हे दाखल झाले. बलात्काराच्या प्रयत्नाचे 3 हजार 800 गुन्हे दाखल झाले. 2 हजार 24 प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्यच बलात्कार करणारा होता.


हेही वाचा – अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -