घरताज्या घडामोडीकोरोना काळात १७४ रेल्वे तिकीट दलालांवर गुन्हे!

कोरोना काळात १७४ रेल्वे तिकीट दलालांवर गुन्हे!

Subscribe

एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० पर्यंत मध्य रेल्वेने १७४ रेल्वे तिकीट दलालांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर १७८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

कोरोना काळात लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल सक्रिय झालेले आहेत. त्यामुळे सायबर सेलच्या मदतीने रेल्वे तिकीट दलालांना पकडण्याकरिता रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० पर्यंत मध्य रेल्वेने १७४ रेल्वे तिकीट दलालांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर १७८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

 १७८ जणांना आरपीएफकडून अटक

मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांची दलाली रोखण्यासाठी व प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. लॉकडाऊन कालावधीत आणि त्यानंतर अनलॉक कालावधीत रेल्वेने विशेष गाड्या वर्गीकृत पद्धतीने चालवण्यास सुरुवात केली आहे. या विशेष गाड्यांमध्ये वैयक्तिक ओळखपत्र (आयडी) वापरुन आरक्षण करणे आणि आरक्षित जागा बळकावण्यासाठी ई-तिकिटांचा वापर केल्याच्या तक्रारी येत आहेत. कारण वेटिंग आणि आरएसी प्रवाशांवर बंदी होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या ई-तिकीटांचा काळाबाजार सुरू होता. मध्य रेल्वेच्या आरपीएफ टीमने तातडीने कारवाई केली आणि सायबर सेलकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे व इतर स्तोत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छापेमारी करण्यास सुरवात केली. मध्य रेल्वेच्या पाचही विभागांत हे छापे टाकण्यात आले. त्यातील बहुतांश खासगी प्रवासी एजन्सींच्या आवारात होते. नोव्हेंबर २०२० पर्यंत भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये तिकीट दलालीचे १७४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

रेल्वेकडे शेकडो तक्रारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने कोविडच्या गाईडलाईननुसार रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा दिली आहे. ज्यात रेल्वे प्रवासासाठी आरक्षण अनिवार्य करण्यात आले होते. ज्याचे रेल्वेचे आरक्षण नाही त्यांना रेल्वे प्रवास नाकारला जात आहे. त्यामुळे इतर पर्याय उपलब्ध नसल्यामुळे प्रवासी या दलालांचा आधार घेत तिकीट विकत घेत होते. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते. या संबंधी शेकडो प्रवाशांच्या तक्रारी रेल्वेकडे आल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -