घरताज्या घडामोडीराज्यातील आरोग्य यंत्रणेवरुन 'सामना'तून विरोधी पक्ष भाजपवर निशाणा

राज्यातील आरोग्य यंत्रणेवरुन ‘सामना’तून विरोधी पक्ष भाजपवर निशाणा

Subscribe

राज्यातील आरोग्य यंत्रणेवरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. मागच्या पाच वर्षात फडवणीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर आज ज्या तात्पुरत्या सुविधा ‘जम्बो’ म्हणून उभाराव्या लागल्या ते प्रमाण कमी झाले असते, असे सामनाच्या अग्रलेखातून म्हणण्यात आले आहे. तसेच डॉक्टर, नर्स यांच्यावर दबाव आणून दहशत निर्माण करण्याचे विरोधकाचे धोरण असल्याची सडेतोड टिका देखील आज सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

सामनाच्या अग्रलेखातून नक्की काय म्हटले?

‘मागच्या पाच वर्षात फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर आज ज्या तात्पुरत्या सुविधा ‘जम्बो’ म्हणून उभाराव्या लागल्या ते प्रमाण कमी झाले असते. विरोधी पक्षांच्या टीकेचा, आरोपांचा मुख्य भर जम्बो कोविड केंद्रांवरच आहे. ही केंद्रे धडपणे चालू द्यायची नाही, त्यात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स यांच्यावर दबाव आणून दहशत निर्माण करायची असे राजकीय धोरण राज्याच्या गंभीर स्थितीस धोकादायक आहे. पुण्यातील राजकारण्यांनी याचे भान ठेवले तर पांडुरंग रायकर, दत्ता एकबोट जे भोगावे लागले ते इतरांच्या नशिबी येणार नाही’, असे सामनाच्या अग्रलेखातून म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पुण्यातला कोरोना रोखण्यासाठी अखेर शरद पवारांचा पुढाकार


 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -