आमच्यावर टीका करणाऱ्यांवर किती केस आहेत विचारा, मुख्यमंत्री शिंदेंचा नेमका निशाणा कोणावर?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविंद्र नाट्य मंदिरात अब्दुल सत्तारांनी सत्कार समारंभ आयोजीत केला होता. यावेळी  तुमच्या हक्काचा माणूस 6 व्या मजल्यावर बसलेला आहे. या पुढे शिवसैनीकांचे खच्चीकरण होऊ देणार नाही. शिवसैनीकांवर अन्याय होऊ देणार नाही.जे आपल्यावर बोलत आहेत त्यांच्यावर किती केसेस आहेत विचारा. या एकनाथ शिंदेवर 100 पेक्षा जास्त केसेस आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली.

 जे बोलत आहेत त्यांच्यावर किती केसेस आहेत विचारा –

शिंदे यांनी हा आमचा लढवय्या शिवसैनिक आहे. आंदोलन करणारा शिवसैनीक आहे. सत्तार साहेब आमच्यात अडीच वर्षांपूर्वी आले. पण ते एकदम शिवसैनीक होऊन गेले आहेत.  जे आपल्यावर बोलत आहेत त्यांच्यावर किती केसेस आहेत विचारा. या एकनाथ शिंदेवर 100 पेक्षा जास्त केसेस आहेत. कधी आम्ही तमा बाळगली नाही. वयाच्या 21 व्या वर्षी एकनाथ शिंदे बेळगावच्या जेलमध्ये 40 दिवस बंद होता, अशी टीका मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेताल टीका करणाऱ्यांवर  केली.

शिवसैनीकांवर अन्याय होऊ देणार नाही –

भाजपाबाबत गैरसमज होता, सीएमपदाच्या खुर्चीसाठी काहीही करतात, असे सांगू लागले. पंतप्रधान, गृहमंत्री, अध्यक्ष, देवेंद्रजी यांनी सीएमपदाची खुर्ची दिली. त्यांचे आभार मी मानले आहेत. मी एकटा मुख्यमंत्री नाही, तुम्ही 50 जण मुख्यमंत्री आहात. आता प्रत्येक शिवसैनिकाला वाटत आहे, की तो मुख्यमंत्री आहे. तो त्याची गाऱ्हाणी सांगत आहे. तुमच्या हक्काचा माणूस सहाव्या मजल्यावर आहे. खच्चीकरण, अन्याय, खोट्या केसेस होऊ देणार नाही, अशी ग्वाही शिंदेंनी बंडखोर आमदारांना दिली.

कुटुंबाचा विचार केला नाही –

आम्ही कधी कुटुंबाचा विचार केला नाही, आमच्या कुटुंबाची नावे घेतली. आम्हाला बदनाम केले. मी माझे आई वडील जेव्हा झोपायचे तेव्हा घरी जायचो. जेव्हा माझे वडील कामावर जायचे तेव्हा मी उठायचो. हे मी माझ्या वडीलांना सभागृहात भाषण करताना सांगीतले. श्रीकात खासदार झाला आहे. तो डॉक्टर झाल आहे. त्याच्याकडे त्यांच्या आईने लक्ष दिले. कारण माझे कुटुंब शिवसेना मानत होतो.आम्ही सगळ्यांनी सहन सहन केले आहे. माझ्या कुटुंबाने साथ दिली. मी प्रत्येक क्षण शिवसेनेसाठी घाताला. रक्ताचे पाणी केले कष्ट केले. म्हणून शिवसेना मोठी झाली आणि तुम्हि आम्हाला हीणवताय. कोण वॉचमन, कोण रिक्षावाला, कोण भाजीवाला, अरे अशा लोकांनाच बाळासाहेबांनी मोठे केले. या लोकांनी बाळासाहेबांची शिवसेना मोठी केली, हे कदापी तुम्हाला विसरता येणार नाही, अशे शिंदे म्हणाले.

मी जिथे जातो तिथे मंत्रालय आहे

पेट्रोल डिझेलचे दर आम्ही कमी केले कारण हे सर्वसामान्यचा सरकार आहे. हा मुख्यमंत्री माझा आहे असे वाटले पाहिजे. लोक म्हणताय मंत्रालय सुरू नाही, ‘अरे मी जिथे जातो तिथे मंत्रालय आहे, जिथे जातो तिथे माझे काम सुरू असते, काम सुरूच आहे. ज्यांना चर्चा करण्याच्या आहेत त्या करू द्या. सकळी 7 पासून पूरस्थितीचा आढावा घेत असतो.