Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची टीका म्हणाले; "शरद पवार भाजपचे..."

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची टीका म्हणाले; “शरद पवार भाजपचे…”

Subscribe

मुंबई : जर भाजप शरद पवारांसमोर खेळत असती. तर शरद पवार हे राजकीय दृष्टीकोनातून भाजपचे बाप आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे. भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीक करत आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

रोहित पवार म्हणाले, “शरद पवारांचा राजकीय अनुभव हा मोठा आहे. भाजप जर अशी खेळी शरद पवार यांच्यासोबत खेळत राहीली. शरद पवार हे राजकीय दृष्टीकोनातून पाहिले. तर भाजपचे बाप आहेत. सध्याची परिस्थितीत भाजपला काय पाहिजे हे शरद पवारांना चांगले माहिती आहे. भाजप कुटुंब आणि पक्ष फोडण्यासाठी जबाबदार असून याबद्दल भाजपला काय बोलायचे आहे का?”, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शासनाने युवकांच्या आयुष्याशी खेळू नये, रोहित पवारांकडून ‘तो’ जीआर रद्द करण्याची मागणी

“शरद पवारांनी भाजपची राजकीय खेळी जुमानली नाही. भाजपने शिवसेना फोडली आणि पक्षातच दोन गट पाडले. यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट केले. आता हे दोन्ही गट एकमेकांवर टीका करत आहेत. दुसरीकडे भाजप निवांस एसी रुपमध्ये बसून हा सर्व तमाशा बघते. पण शरद पवारांचा राजकीय अनभुव हा 60 वर्षांचा आहे,” असे रोहित पवार म्हणाले.

- Advertisement -

- Advertisment -