शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचा निधी रोखण्यावरून सतेज पाटलांची टीका, म्हणाले…

Satej Patil

नवे सरकार आल्यानंतर संभाजी महाराजांच्या पुण्यातील स्मारकाचा निधी रोखण्यावरून आरोप प्रत्यारोप झाले होते. यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील महापुरुषांच्या स्मारकाचा निधी रोखलेला नाही, असे स्पष्ट केले होते. पण त्याचवेळी काँग्रेसनेते सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळासाठी दिलेला निधी रोखण्यावरून शिंदेगट आणि भाजपवर टीका केली.

राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळावरून टीका –

यावेळी हे योग्य नाही. यासंदर्भात दोन्ही काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटले आहे. ही सार्वजनिक कामे आहेत, कुणाच्या घरची नाहीत, त्यावरील स्थगिती उठवा, अशी मागणी केली आहे. किमान शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाला तरी स्थगिती द्यायला नाही पाहीजे होती, असे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी म्हणाले.

कोल्हापूर विमानतळासंदर्भात सतेज पाटील काय म्हणाले –

विमानतळासंदर्भात आमच्या सरकारच्या काळात जवळपास 200 कोटींचा निधी मंजूर झाला होता. काही तडजोडीने या जमिनी ताब्यात घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले टाकली आहेत. लवकरात लवकर 64 एकर जमीन ताब्यात मिळावी. आधी आठवड्याला बैठक घेत होतो. आता जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला हे काम लवकर करण्याचे सांगितले आहे, असे पाटील म्हणाले.

गोकुळमध्ये काहीही फरक पडणार नाही –

एका बाजूला गोकुळमध्ये प्रवृत्ती होती, तिला हटवण्यासाठी गोकुळच्या स्वाभिमानी मतदारांनी या पॅनेलला निवडून दिले. त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. सत्ता असो किंवा नसो, आम्ही कायम जनतेत असतो, असे ते म्हणाले. 2011पासून जनगगना झाली नाही. त्यामुळे काही लॉजिक लावून हे मतदार संघ वाढवले होते. सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर करत म्हटले आहे, की आम्ही निवडणुका घेऊ. सुप्रीम कोर्टानेदेखील त्याला अनुकूलता दर्शवली होती. असे असतानादेखील काहीतरी करायचे, निवडणुका पुढे ढकलायचा हा हेतू सरकारचा आहे, अशी टीका त्यांनी केली.