घरमहाराष्ट्रमगरीचे पिल्लू धरणातून शेतात

मगरीचे पिल्लू धरणातून शेतात

Subscribe

तालुक्यातील चौक हद्दीतील भिलवले धरणातील मगरीचे पिल्लू सांडव्यातून पाण्याबरोबर वाहत आसरे गावानजीक शेतात आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून, पाटबंधारे विभागाकडून आवश्यक उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत.

रविवारी आसरे येथील एका शेतकर्‍याला शेतात मृत मगरीचे पिल्लू आढळून आले.त्याने तत्काळ वन विभागाला याबाबतची माहिती दिल्यानंतर वन क्षेत्रपाल आशिष पाटील व इतर कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन हे पिल्लू ताब्यात घेतले. येथील पशु वैद्यकीय रूग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. भिलवले धरण 30 जून रोजी पूर्णपणे भरल्यानंतर सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊ लागल्यानंतर एक मृत मगरीचे पिल्लू आढळले होत. त्यानंतर तीन जिवंत मगरी प्राणी मित्र संघटना व वन विभागाने संयुक्त शोध मोहीम राबवून पकडल्या व त्यांना सुरक्षित नैसर्गिक अधिवासात पुन्हा सोडण्यात आल होते.

- Advertisement -

मगरींचा धरणात वावर असल्याच्या शक्यतेने वन विभाग आणि आपत्कालीन मदत यंत्रणा, तसेच प्राणी मित्र यांच्या मदतीने बोटीतून धरणात शोध मोहिम राबविण्यात आली होती. शोध पथकाच्या जाळ्यात दोन वर्षे वयाची मगर सापङली. गोड्या पाण्यात आढळणार्‍या मगरी भिलवले धरणात सोडण्यात आल्या असाव्यात, अशी शक्यता वन अधिकारी वर्तवित आहेत. अशा प्रकारच्या मगरी महाड येथील सावित्री नदीच्या पात्रात आढळत असल्याने पकडण्यात आलेल्या मगर पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येत आहेत.

आसरे गावात सापडलेलं मगरीच पिल्लू अंदाजे सहा महिन्यांचे आहे. शवविच्छेदनानंतर योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. ग्रामस्थांनी घाबरून न जाता तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा. मगरीचे पिल्लू हल्ला करेल या भीतीतून त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये.
-आशिष पाटील, वन क्षेत्रपाल, खालापूर

- Advertisement -

सांडव्यातून मगरीचे पिल्लू वाहत गेल्यामुळे आणखी पिल्लांची शक्यता असून, सांडव्यानजिक जाळी लावण्यासारखा प्रयोग पाटबंधारे विभागाने करणे गरजेच आहे.
-रोहिदास ठोंबरे, आसरे-चौक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -