घरताज्या घडामोडीसमीर वानखेडे प्रकरणात NIAची एन्ट्री, वानखेडेंच्या चौकशीसाठी NIA टीम NCB कार्यालयात दाखल

समीर वानखेडे प्रकरणात NIAची एन्ट्री, वानखेडेंच्या चौकशीसाठी NIA टीम NCB कार्यालयात दाखल

Subscribe

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री झाली आहे. समीर वानखेडे यांची २५ कोटी रुपये खंडणी प्रकरणी एनआयएच्या ५ अधिकाऱ्यांच्या पथकाकडून चौकशी सुरू आहे. ड्रग्ज प्रकरणात काशिफ खान आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्यामुळे या प्रकरणात आता एनआयएने एन्ट्री केली आहे. शुक्रवारी एनआयए टीम एनसीबी कार्यालयात गेली होती.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी क्रूझवर केलेल्या कारवाईत आर्यन खानला अटक केली. आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटी रूपये खंडणी मागीतली असा आरोप समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात एनसीबी टीम वानखेडे यांची चौकशी करत असताना आता एनआयए टीमची एन्ट्री झाली आहे. एनआयएने आर्यन खानच्या प्रकरणाची माहिती मिळवली आहे. शुक्रवारी एनआयएची टीम एनसीबी कार्यालयात गेली होती. एनआयएने आर्यन खानच्या प्रकरणाची माहिती मिळवली असून या प्रकरणात काशिफ खान आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडकीस आले आहे. यामुळे एनआयए देखील चौकशी सुरू करू शकते लवकरच समीर वानखेडे यांची एनआयए चौकशी होण्याची शक्यता आहे

- Advertisement -

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या वरील आरोपांचा दक्षता पथक या तपास करत आहे. मात्र सध्या यावर कोणताही निर्णय झालेला नाही. वानखेडे यांच्यावर आरोप करणारा प्रभाकर साईल संपर्कात नसल्याने त्याची चौकशी करण्यात आली नाही तसेच किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्याचीही चौकशी करण्यात आली नाही यामुळे अजूनही वानखेनडेंच्या विरोधात ठोस पुरावा मिळाला नाही असे एनसीबी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले आहे.


हेही वाचा: के.पी गोसावीच्या चौकशीसाठी न्यायालयात जाणार, NCB अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांची माहिती

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -