घरताज्या घडामोडीCruise Drug Case : पिक्चर अभी बाकी है.., आर्यनला जामीन मिळाल्यावर नवाब...

Cruise Drug Case : पिक्चर अभी बाकी है.., आर्यनला जामीन मिळाल्यावर नवाब मलिकांचे ट्विट, निशाणा कोणावर?

Subscribe

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान पुत्र आर्यन खानला अटक करण्यात आली होती. २६ दिवसांच्या कोठडीनंतर अखेर हायकोर्टाकडून आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. हायकोर्टाने गुरुवारी आर्यन खानला दिलासा दिला असून त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंटला देखील जामीन मंजूर करण्यात आला आहे. आर्यनच्या जामीननंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सूचक ट्विट केलं आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे. मलिकांच्या ट्विटचा रोख नक्की कोणाकडे आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला हायकोर्टाने जामीन मंजूर केल्यावर ट्विट केलं आहे. आर्यन खानला एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. आर्यन खान २ ऑक्टोबरपासून कोठडीमध्ये आहे. आर्यन खान २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर एनसीबी कोठडीत होता त्यानंतर सध्या आर्यन खान न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला जामीन मिळाला असला तरी कोर्टाची ऑर्डर आल्यावर सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आर्यनची सुटका शुक्रवारी किंवा शनिवारी होणार आहे. आर्यन खानला काही अटींच्या आधारावर जामीन देण्यात आला आहे.

- Advertisement -

आर्यन खानला जामीन मिळाला आहे परंतु राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असे ट्विट नवाब मलिकांनी केलं आहे. यामुळे आता नवाब मलिक काय गौप्यस्फोट करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कारवाईवर नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई बोगस असून भाजप नेते यामध्ये सहभागी असल्याचा आरोप मलिकांनी केला होता. तर आता हे प्रकरण जात प्रमाणपत्रापर्यंत आले आहे. वानखेडेंनी दाखवलेले जातप्रमाणपत्र खोटं असल्याचे मलिकांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

नवाब मलिकांचा आरोप काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. वानखेडेंनी बोगस कारवाई केली, अभिनेत्यांकडून वसुली केली, महाराष्ट्र आणि बॉलिवुड इंडस्ट्री बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच वानखेडेंनी खोटे जातप्रमाणपत्र दाखवून एका विद्यार्थ्याची नोकरी हिसकावली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडे यांना एका वर्षात कामावरुन काढून टाकणार तसेच तुरुंगात टाकणार असल्याचा इशारा देखील मलिकांनी दिला आहे.


हेही वाचा : Cruise Drug Case : आर्यन खानला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -