Cruise Drug Case: माझ्या कारकिर्दीत कधीही चुकीच वागलो नाही, तरीही कुटुंबिय लक्ष्य; वानखेडेंनी कोर्टात मांडली बाजू

Cruise Drugs Case aryan khan drugs sameer wankhedes life danger z plus security provided center

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीचा पंच असलेला प्रभाकर साईलने काल, रविवारी मोठा गौप्यस्फोट केला. यानंतर एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. त्यामुळे आज समीर वानखेडे यांनी सत्र न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडून सर्व आरोप फेटाळले असून वानखेडे आणि एनसीबीने स्वतंत्र प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले आहे. ‘याप्रकरणाचा पर्दाफाश केल्याचे मला लक्ष्य केलं जात आहे. मी माझ्या कारकिर्दीत कधीही चुकीचा वागलो नाही. पण आता माझ्या कुटुंबियांना लक्ष्य केलं जात आहे. मी कोणत्याही चौकशीला सामोर जाण्यासाठी तयार आहे,’ असं समीर वानखेडे यांनी न्यायालयाला सांगितलं. (Cruise Drug Case NCB Zonal Director Sameer Wankhede told the judge that he was being targeted and is ready for a probe)

आज सकाळी एनसीबीचा पंच असलेला प्रभाकर साईल समीर वानखेडे यांची भीती वाटते. माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे संरक्षणाची मागणी करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचला होता. त्याचदरम्यान दुसऱ्या बाजूला समीर वानखेडे यांनी हे प्रकरण मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयात वर्ग केले आणि तिथे जाऊन वानखेडे यांनी स्वतः साक्ष दिली. वानखेडे म्हणाले की, काही जणांकडून जाणूनबुजून मला वैयक्तिरित्या लक्ष्य केलं जात आहे. माझ्या दिवगंत आई, वडील, बहीण आणि पत्नीला टीकेला सामोर जावं लागत आहे. त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. कुठेतरी या तपासापासून, संपूर्ण प्रकरणापासून लक्ष्य विचलित करण्यासाठी हे केलं जात आहे. शिवाय एनसीबी ज्या वेगाने तपास करत आहेत, त्यातून काही खुलासे होत आहेत, त्यामुळे यातून लक्ष्य हटवण्याचे काम केलं जात आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत कुठेही चुकीचो वागलो नाही. कुठल्याही प्रकरणात कायदा भंग केला नाही. त्यामुळे हे आरोप बिनबुडाचे असून कुठल्याही चौकशीला सामोर जाण्यास तयार असल्याचे न्यायमूर्ती व्ही.व्ही. पाटील यांच्यासमोर सांगितले. एनसीबीने प्रतिज्ञापत्र सादर केलं असून यातून पंच फुटल्याची माहिती त्यातून देण्यात आली. समीर वानखेडे यांनी आणि एनसीबीने दोन स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहेत.

काल, रविवारी जेव्हा प्रभाकर साईलने याप्रकरणातील खळबळजनक माहिती दिली. तेव्हा पासून समीर वानखेडे यांच्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थितीत होऊन लागले. त्यामुळे रविवारी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना एक पत्र लिहिले. यात वानखेडे म्हणाले की, ‘याप्रकरणात मला चुकीच्या पद्धतीने अडकवलं जातंय.’ त्यामुळे संभाव्य कारवाईपासून संरक्षण देण्याची मागणी वानखेडेंनी पत्राद्वारे केली होती.


हेही वाचा – Cruise Drugs Case: वानखेडेंकडून माझ्या जीवाला धोका, प्रभाकर साईल तक्रारीसाठी पोलीस आयुक्तालयात