Cruise drugs bust : मुंबई NCB चे ‘सिंघम’ अधिकारी समीर वानखेडे

Central government to take action against Sameer Wankhede in Aryan Khan drugs case
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण,  केंद्र सरकार करणार समीर वानखेडेंवर कारवाई?

नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोने शनिवारी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर छापेमारी करत मोठ्याप्रमाणात ड्रग्ज साठा जप्त केला. याप्रकरणी एनसीबीने अभिनेता शाहरुखनचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांनी चौकशी केली. या चौकशीनंतर आता आर्यन खानसह तिघांना अटक केली आहे. या अटकेनंतर तिघांची वैद्यकीय तपासणी करत सायंकाळी ७ वाजता कोर्टासमोर हजर केले आहे. यासंपूर्ण प्रकरणात सध्या समीर वानखेडे हे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे.

समीर वानखेडे एनसीबीच्या मुंबई कार्यालयात झोनल डायरेक्टर आहेत. वानखेडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारेचं शनिवारी एनसीबीच्या पथकाने क्रूझवरील ड्रग्ज पार्टी उधळून लावली आहे. खासकरुन मुंबईतील काही काळापासून सुरु असलेल्या ड्रग्जविरोधातील धडक कारवायांमुळे समीर वानखेडे प्रकाश झोतात आहे.

गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणानंतर बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आले होते. त्यावेळीही समीर वानखेडे हे नाव मोठ्याप्रमाणात चर्चेत होते. त्यामुळे मुंबई NCB चे सिंघम अधिकारी म्हणून समीर वानखेडे यांना ओळखले जाते. याशिवाय अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज देखील त्यांच्या नावाला घाबरून आहेत.

मुळचे महाराष्ट्रातील असलेले समीर वानखेडे हे २००८ च्या बॅचमधील आयआरएस अधिकारी आहे. भारतीय महसूल सेवेत पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची पहिली पोस्टींग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल उपायुक्त पदावर करण्यात आली. त्यांच्या धडक कारवाया पाहता त्यांची बदली आंध्र प्रदेश आणि दिल्लीत करण्यात आली.

आता शाहरुख खानच्या मुलाची चौकशी समीर वानखेडे करत आहेत. सध्या धडक कारवायांमुळे समीर वानखेडे हे ट्रेंडिंगमध्ये आहेत. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत एनसीबीने कोट्यवधींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आतापर्यंत त्यांनी २ हजारहून अधिक लोकांविरुद्ध अमली पदार्थविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. तर जवळपास १७ हजार कोटींहून अधिक रुपयांचं ड्रग्ज जप्त केला आहे.

बॉलिवूडमध्ये समीर वानखेडे या नावाची वेगळी दहशत पाहायला मिळत आहे. समीर वानखेडे यांनी यापूर्वी गायक मिका सिंहला मुंबई एअरपोर्टवर परदेशी करंसीसह रंगेहाथ पकडले होते. त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमनं आत्तापर्यंत बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, राम गोपाल वर्मासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापेमारी केली आहे.

समीर वानखेडे हे मराठीतील अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. समीर वानखेडे यांनी २०१७ साली मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी विवाह केला. त्यांना जुळी मुलं आहेत.