घरताज्या घडामोडीCruise Drugs Case: साक्षीदार किरण गोसावीचा नवी ऑडिओ क्लिप व्हायरल; युपीच्या पोलिसांनी...

Cruise Drugs Case: साक्षीदार किरण गोसावीचा नवी ऑडिओ क्लिप व्हायरल; युपीच्या पोलिसांनी दुसरीकडे शरण जाण्यास सांगितले

Subscribe

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील प्रमुख साक्षीदार किरण गोसावी शरण येणार असल्याची माहिती काल, सोमवारी समोर आली होती. किरण गोसावीने अनेक माध्यमांशी बोलून उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये शरण येणार असल्याचे सांगितले होते. पण उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी किरण गोसावीला दुसरीकडे शरण जाण्यास सांगितले. यासंदर्भातील एक नवी ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये किरण गोसावी आणि उत्तर प्रदेशमधील मढिया पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी बोलत आहेत. ते काय बोलले? ते वाचा

- Advertisement -

किरण गोसावी – सर, मढिया पोलीस स्टेशन

मढिया पोलीस स्टेशन – हो

- Advertisement -

किरण गोसावी – सर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आता आहात का?

मढिया पोलीस स्टेशन –  हा. काय झाले?

किरण गोसावी – मला तिकडे यायचे होत. मी किरण गोसावी बोलत आहे.

मढिया पोलीस स्टेशन – हा. तर इकडे का यायचे आहे?

किरण गोसावी – मला शरण जायचे आहे.

मढिया पोलीस स्टेशन – मढिया पोलीस स्टेशनमध्येच का शरण यायचे आहे?

किरण गोसावी – कारण माझ्यासाठी जवळचे पोलीस स्टेशन हेच आहे.

मढिया पोलीस स्टेशन – असे नाही आहे. तुम्ही दुसरीकडे पाहा.

दरम्यान एका हिंदी वृत्तसंस्थेशी बातचित करताना किरण गोसावी म्हणाला की, ‘माझी महाराष्ट्र पोलिसांसमोर शरण जाण्याची इच्छा आहे, परंतु तिथल्या राजकारणामुळे मी लपलो होतो. मी क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील सत्य सांगू इच्छित आहे. मला कोणीतरी सांगितले होते की, माझ्या पुण्यातील प्रकरणात अटक केल्यानंतर खूप वाईट प्रकारे टॉर्चर केले जाईल. त्यामुळे महाराष्ट्रात माझ्या जीवाला धोका असल्यामुळे मी लखनऊमध्ये शरण जाईल. मला सतत धमक्याचे फोन येत आहे.’ पण आता उत्तर प्रदेश पोलिसांनीच किरण गोसावीला दुसरीकडे शरण जाण्यास सांगितले आहे. माहितीनुसार आता पुणे पोलीस किरण गोसावीला पकडण्यासाठी लखनऊला रवाना झाले आहेत.


हेही वाचा – Aryan Khan Bail Hearing: आर्यन खानला मिळणार का जामीन? आज जामीन अर्जावर हायकोर्टात होणार सुनावणी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -