घरताज्या घडामोडीCruise Drugs Case: प्रभाकर साईलच्या खंडणी आरोपात काही तथ्य नाही - NCB

Cruise Drugs Case: प्रभाकर साईलच्या खंडणी आरोपात काही तथ्य नाही – NCB

Subscribe

क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला आर्यन खानसोबत किरण गोसावीचा सेल्फी काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. याच किरण गोसावीच्या बॉडीगार्ड प्रभाकर साईलने स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करून आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुखकडे २५ कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा दावा केला. परंतु ही डील १८ कोटींची झाली आणि त्यातील ८ कोटी समीर वानखेडे आणि उर्वरित पैसे आपल्यात वाटून घेण्याचे ठरले, असे संभाषण गोसावीसोबत झाल्याचे प्रभाकर साईलने ऐकल्याचे व्हिडिओतून सांगितले. परंतु आता एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी प्रभाकर साईलने केलेले खंडणीचे आरोप फेटाळून लावले आहेत. यासंदर्भातील पत्रक जारी करत हे आरोप तथ्यहीन असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले आहे.

सध्या किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याने केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. प्रभाकर साईलने केलेले सर्व आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळले असून एनसीबीचे डीडीजी मुठा अशोक जैन यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या संदर्भातील एनसीबीने पत्रक जारी करत म्हटले आहे की, हे प्रकरण सध्या न्यायलयासमोर आहे. पंच असलेल्या प्रभाकर साईल यांनी त्यांना जे काही सांगायचे आहे, ते कोर्टासमोर सांगावे सोशल मीडियाच्या माध्यमातून नाही. प्रभाकर साईलचे प्रतिज्ञापत्र पुढील कारवाईसाठी एनसीबी संचालकांना पाठवण्यात आले आहे. यावर योग्य ती कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे.’

- Advertisement -

प्रभाकर साईल हा किरण गोसावीकडे बॉडीगार्ड म्हणून २२ जुलै २०२१ला रुजू झाला. पण वैयक्तिक प्रोब्लेममुळे प्रभाकर साईल ३० जुलै २०२१ रोजी सर्व कपडे घेऊन कायमचा किरण गोसावीकडे ठाण्याच्या राहत्या घरी राहायला गेला. प्रभाकर साईलचे राहणे, पगार सर्व काही ठरले. पण ८ सप्टेंबरला किरण गोसावीने ठाण्यातील राहत घर सोडले आणि त्यानंतर वाशीला शिफ्ट झाले. तेव्हापासून प्रभाकर साईल गोसावीकडे काम करत आहे, असे त्याने सांगितले आहे.


हेही वाचा- Cruise Drugs Case: महाराष्ट्रातून फिल्म इंडस्ट्री निघून जाण्यासाठीचं हे षडयंत्र – संजय राऊत

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -