घरताज्या घडामोडीसिंधुदुर्गातील जमावबंदी राजकीय आहे,आशिष शेलार यांचा आरोप

सिंधुदुर्गातील जमावबंदी राजकीय आहे,आशिष शेलार यांचा आरोप

Subscribe

जमावबंदीचे आदेश कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी होती की राणे यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी होते

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा (Janashirwad Yatra) शुक्रवारी रात्री सिंधुदुर्गात (Sindhurg) पोहचली. राणे सिंधुदुर्गात दाखल झाल्यापासून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी भाष्य केले आहे. ‘सिंधुदुर्गात केलेली जमावबंदी राजकीय’,असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. ( curfew in Sindhudurg is political Ashish Shelar) ‘जमावबंदीचे आदेश कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी होती की राणे यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी होते. राज्याला बंदीवान करण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे. त्यांच्याविरोधातील हा जनक्षोभ आहे. राणे यांच्या प्रेमामुळे जनता रस्त्यावर उतरली आहे’, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

लोकमान्य टिळकांना स्मरण करणे ही आवश्यकता नसून आमचे कर्तव्य आहे. लोकमान्य टिळकांचा परिचय हा भारताच्या असंतोषाचे जनक म्हणून करण्यात येते. आजच्या महाराष्ट्रातील असंतोषाचे जनक हे मुख्यमंत्री आहेत टीका आम्ही केली कारण पहिल्या दिवसापासून, तिवारीचे मुंडण,कंगणा रणौतच्या कार्यालयावरची कारवाई,सीबीआयला प्रवेश नाही यासारख्या प्रकारामुळे मुख्यमंत्री हे असहिष्णूतेचे जनक आहे असा परिचय होत आहे.

- Advertisement -

ओबीसी आरक्षणासाठी कोणत्याही दरवाज्यासमोर उभे राहू

ओबीसी आरक्षणासाठी आम्ही कोणाचेही दार ठोठवू. ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी पक्षविरहीत भूमिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली त्याचे कौतुक आहे. आम्ही राजकीय विरोधक आहोत कोणाचे शत्रू नाही. ही हिंदुस्तान पाकिस्तानची लढाई नाही. विरोधकाचा राजकीय विरोध करू आणि जनहितासाठी कोणत्याही दरवाज्यासमोर उभे राहू ही भाजपची भूमिका असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले. विरोधी नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांची बंद दाराआड जी चर्च झाली त्यांच्या भेटी झाल्या या राजकीय संगोपचारच्या आहेत. आम्ही कोणाचेही शत्रू नाहीत. आम्ही राजकीय विरोधक आहोत त्यामुळे शिवसेनेवर सडकून टीका करू. राज्याच्या हितासाठी कोणाचेही दरवाजे ठोठावू असे आशिष शेलार यांनी म्हटले.

सत्तेत बसलेल्या शिवसेनेला काही संयम आणि मर्यादा ठेवाव्या लागतील काही गोष्टी सहन कराव्या लागतील, म्हणून ते असहिष्णूतेचे जनक आहेत. कानशिलात लगावणे या वाक्यात जर तरचा मुद्दा होता त्यावर दिलेल्या प्रतिक्रियेतून एका संयमित व्यक्तीसोबत राहून संकूचित वृत्तीचे दर्शन शिवसेनेने केले आहे,अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेनेतील नाराज आमदार माझ्या संपर्कात, नारायण राणेंचा गौप्यस्फोट

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -