घरताज्या घडामोडीआषाढी वारीसाठी १७ ते २५ जुलै दरम्यान पंढरपूरात संचारबंदी

आषाढी वारीसाठी १७ ते २५ जुलै दरम्यान पंढरपूरात संचारबंदी

Subscribe

चंद्रभागा परिसरात १४४ कलम लागू करण्यात येणार

पंढरपूरात होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी कलम १४४च्या अंतर्गत संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. या काळात चंद्रभागा परिसरात १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. तर सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी लागू करण्यात येणार आहे. १७ जुलै ते २५ जुलै या काळात पंढरपूरात कलम १४४ लागू राहणार आहे. परवानगी नसलेल्या भाविकाला सोलापूर जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. २० जुलै रोजी यंदाची आषाढी एकादशी आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही भाविकांना पंढरपूर यात्रेला जाता येणार नाहीये. (Curfew under section 144 in Pandharpur from July 17 to 25 for Ashadi Wari)

२० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. मात्र प्रशासनाने १७ जुलै ते २५ जुलै असे नऊ दिवस पंढरपूरात संचार बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संचारबंदी पंढरपूर आणि आजूबाजूच्या दहा गावात लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता त्या प्रस्तावाला आता शासनाने हिरवा कंदील दिला आहे. पंढरपूरात गेल्यानंतर चंद्रभागेत आंघोळीसाठी भाविकांची मोठी गर्दी असते त्यामुळे चंद्रभागा नदीच्या परिसरात १४४ कलमातंर्गत संचार बंदी लागू करण्यात येणार आहे. ज्या लोकांना शासनाने परवानगी दिली आहे त्याच लोकांना पाच दिवस पंढरपूरात येण्याची परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी पंढरपूरात केवळ दोन दिवसांची संचार बंदी लागू करण्यात आली होती. गेल्या वर्षी दशमीला पालखी येऊन द्वादशीला पालख्या गेल्या. त्यामुळे गेल्या वर्षी दोन दिवसांची संचार बंदी लागू करण्यात आली होती. यावेळी मात्र सहा दिवस पालख्या पंढरपूरात राहणार आहेत. त्यामुळे हे सहा दिवस काळजी घेणे गरजेचे असल्याकारणाने संपूर्ण पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या दहा गावात संचार बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


हेही वाचा – महाबळेश्वरच्या गुहेत सापडलेल्या दोन वटवाघूळात निपाह विषाणू, NIV ची माहिती

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -