घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राचे खच्चीकरण करण्यासाठी हे सर्व प्रयत्न; आक्षेपार्ह विधानांवर नीलम गोऱ्हे आक्रमक

महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्यासाठी हे सर्व प्रयत्न; आक्षेपार्ह विधानांवर नीलम गोऱ्हे आक्रमक

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून बरेच नेते मंडळी महिलांबाबत, मराठी माणूस आणि महाराष्ट्रावर विधान करत आहे. विशेष म्हणजे त्यांची प्रत्येक विधाने ही आक्षपार्ह ठरत असून, या आक्षेपार्ह विधानांवर आता विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आक्रमक झाल्या आहेत.

मागील अनेक दिवसांपासून बरेच नेते मंडळी महिलांबाबत, मराठी माणूस आणि महाराष्ट्रावर विधान करत आहे. विशेष म्हणजे त्यांची प्रत्येक विधाने ही आक्षपार्ह ठरत असून, या आक्षेपार्ह विधानांवर आता विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आक्रमक झाल्या आहेत. ‘वक्तव्यातून मूळ विषयापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. अशा वक्तव्यांची मालिका सध्या महाराष्ट्र अन् मराठी माणसांविरोधात सुरू आहे. यातूनच मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहे’, असा आरोप डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. (Currently a series of absurd statements to mislead people of maharashtra says neelam gorhe)

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लातुरामध्ये रविवारी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी हा आरोप केला. यावेळी त्या म्हणाल्या की, “महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्राबद्दल करण्यात आलेले वक्तव्य निषेधार्ह, आक्षेपार्ह आहेत. राज्यापालांबरोबर अनेकजण महाराष्ट्राच्या विरोधात जाणीवपूर्वक वक्तव्य करत आहेत का? अशी शंका आता यायला लागली आहे. रामदेवबाबांनी केलेले व्यक्तव्य तमाम महिलांचा अवमान करणारे आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. समाजमाध्यमातून जाणीवपूर्वकच समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज, व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. विखारी विचार प्रसारित करत जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोपही गोऱ्हे यांनी केला.

- Advertisement -

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर आणि अक्कलकोट आम्हाला द्या, अशी भूमिका मांडण्यात आली आहे, तर गुजरातकडून महाराष्ट्रातील प्रकल्प, उद्योग पळविण्याचे षड्यंत्र रचले जात आहेत. यातून महाराष्ट्र आणि येथील मराठी माणसांना अस्थिर करण्याबरोबरच त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गुजरात आणि कर्नाटकाकडून दबाव आणून अस्थिरता निर्माण केली जात आहे”, असेही नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जाणीवपूर्वक आरोप केले जात असून, मूळ विषयावरील लक्ष विचलित करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. प्रक्षप्रमुखांना ठरवून लक्ष्य केले जात आहे. विरोधकांना राज्याच्या विकासापेक्षा यातून केवळ राजकारण करायचे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्रीच चार महिन्यांपासून चालवतायत यात्रा कंपनी, ठाकरे गटाचे जोरदार टीकास्त्र

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -