घरCORONA UPDATECoronavirus : आयसोलेटेड, होम क्वॉरंटाइन लोकांवर 'सीव्हीडी ट्रॅकर'ची करडी नजर!

Coronavirus : आयसोलेटेड, होम क्वॉरंटाइन लोकांवर ‘सीव्हीडी ट्रॅकर’ची करडी नजर!

Subscribe

चंदीगड येथे घरात आयसोलेटेड असणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी एका मोबाइल अँपचा वापर जाणार आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासन वेळोवेळी सूचना देत असतात. याशिवाय कोरोनाशी लढण्यासाठी विविध उपाययोजना ही केल्या जात आहेत. चंदीगडमध्ये एक स्मार्ट, डिजिटल उपाय योजण्यात येत आहे. चंदीगड येथे घरात आयसोलेटेड असणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी एका मोबाइल अँपचा वापर जाणार आहे. अँपद्वारे कोरोनासंबंधी निर्देशांचं पालन होतंय की नाही याबाबत माहिती मिळणार आहे. या अँपला ‘सीव्हीडी ट्रॅकर’ (CVS – Tracker) असं नाव देण्यात आले आहे.

हा अँप ट्रॅक केलेल्या व्यक्तीच्या हॉटस्पॉटची मर्यादा चिन्हांकित करेल. आयसोलेशनमध्ये असणाऱ्या लोकांना आपल्या मोबाईलमध्ये हे अँप डाउनलोड करणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, आयसोलेशनमध्ये असणाऱ्या प्रत्येक अँप युजरला आयसोलेशन भागाच्या 50 मीटरच्या अंतरातच राहावे लागेल. युजरला प्रत्येक तासाला एक सेल्फी अपलोड करावा लागेल. त्यानंतर त्याचा सेल्फी आणि आयसोलेशनची जागा मॅच केली जाईल.

- Advertisement -

असा होणार सीव्हीडी ट्रॅकरचा वापर

मिळालेल्या अहवालानुसार, आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेला कोरोनाबाधित मर्यादित रेंजच्या बाहेर गेल्यास प्रशासनाला एक अलर्ट पाठवला येईल. त्यासोबत संसर्ग झालेल्या व्यक्तीलाही इशारा केला जाईल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर एफआयआर दाखल होऊन कठोर कारवाई करण्यात येईल. फोन बंद असल्यावरही प्रशासनाला अलर्ट जाईल. आयसोलेशनमध्ये असणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी एक टीम आणि कंट्रोल रूम तयार करण्यात आला आहे.

आयटी डिपार्टमेंटमधील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या दिवसांत आयसोलेशनमधील लोकांच्या संख्येत वाढ होऊ शकते. हे अँप जीपीएस लोकेशनच्या मदतीने फायदेशीर ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -