घरताज्या घडामोडी२० महिलांवर बलात्कार आणि हत्या; सायनाइड मोहनला जन्मठेप

२० महिलांवर बलात्कार आणि हत्या; सायनाइड मोहनला जन्मठेप

Subscribe

महिलांवर बलात्कार करून त्यांची साइनाइड देऊन हत्या करणाऱ्या मोहनला यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती. मात्र या फाशीच्या काही गुन्ह्ंयामध्ये शिक्षेला जन्मठेपेत बदलण्यात आले आहे.

कुख्यात गुन्हेगार मोहन कुमार याने २००६ मध्ये एका २३ वर्षीय महिलेची हत्या केल्या प्रकरणी कासरागोड कोर्टाने (केरळ राज्य) सोमवारी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कासरागोड कोर्टाचे न्यायाधीश सैदुनिसा यांनी वीसपैकी १९ व्या प्रकरणात ही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यात दोषी मोहनला २५ हजारांचा दंड देखील सुनावला आहे. मोहनने यापूर्वी २० महिलांची सायनाइड देऊन हत्या केली आहे. त्यातील १९ व्या गुन्ह्यामध्ये त्याला ही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आरोपीचे खरे नाव मोहन कुमार असले तरी तो सायनाइड या नावाने प्रसिद्ध झाला होता. मोहन एखाद्या महिलेसोबत ओळख वाढवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा आणि बलात्कार करून त्यांची हत्या करायचा. अशा ५ गुन्ह्यांमध्ये मोहनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर तीन प्रकरणामध्ये फाशी कायम करण्यात आली आहे. तर दोन प्रकाराणांमध्ये फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे.

- Advertisement -

२००५ ते २००९ मध्ये २० खून

मोहन कुमारचा १९६३ मध्ये कर्नाटक राज्यात जन्म झाला होता. मोहन महिलांशी लग्न करुन त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करायचा. त्यानंतर पत्नीला गर्भनिरोधक गोळ्या देण्याच्या बहाण्याने सायनाइड खायला द्यायचा. वर्ष २००५ ते २००९ मध्ये त्याने अशाप्रकारे २० महिलांचा खून केला होता.

मोहन कुमार हा महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर लॉजवर नेऊन त्यांच्यावर बलात्कार करायचा. लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडे दागिन्याची मागणी करायचा त्यानंतर त्यांना गर्भनिरोधक गोळ्या देण्याच्या बहाण्याने सायनाइड खायला द्यायचा. २००९ साली याच प्रकारे त्याने बंटवाल (कर्नाटक मधील शहर) येथे लॉजवरुन पळ काढला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -