घरताज्या घडामोडीनिवडणुकीच्या तिकिटाचे आमिष दाखवून दिवंगत आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाची फसवणूक

निवडणुकीच्या तिकिटाचे आमिष दाखवून दिवंगत आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाची फसवणूक

Subscribe

कुणाल यांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्याने संपर्क साधून उमेदवारी मिळवून देतो, असे आमिष दाखविले. सायबर चोरट्याने पक्षातील प्रमुख नेत्यांची नावे सांगून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. कुणाल यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

एकीकडे कसबा निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे तर, दुसरीकडे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. (cyber thieves attempt to frame son of late mla mukta tilak by offering him election ticket)

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवून देण्याचे आमिष दाखविणारा फोन सायबर चोरट्यांनी केल्याचे उघडकीस आले आहे. सायबर चोरट्यांनी त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. याबाबत टिळक यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

- Advertisement -

कुणाल यांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्याने संपर्क साधून उमेदवारी मिळवून देतो, असे आमिष दाखविले. सायबर चोरट्याने पक्षातील प्रमुख नेत्यांची नावे सांगून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. कुणाल यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवारी मिळवण्यासाठी आपली तयारी दाखवत असून, काही जण पक्षश्रेष्ठींकडे मोर्चे बांधणी करत आहेत.

- Advertisement -

भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीतील इच्छुकांकडून प्रयत्न सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाकडून अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश, चिरंजीव कुणाल यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.


हेही वाचा – आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानसमोर आणखी एक संकट, इराणने दिला दंडाचा इशारा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -