Homeमहाराष्ट्रCyclone Fengal Effect : यामुळे राज्यातून गुलाबी थंडी गायब; मुंबई शहरात पावसाचा...

Cyclone Fengal Effect : यामुळे राज्यातून गुलाबी थंडी गायब; मुंबई शहरात पावसाचा शिडकावा

Subscribe

डिसेंबर महिना आला की चाहूल लागते ती गुलाबी थंडीची. पण यंदा मुंबईसह राज्यात वातावरणात बदल झाल्याने गुलाबी थंडीच गायब झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे. डिसेंबर महिना आला की वेध लागतात ते गुलाबी थंडीचे, पण यंदा हीच गुलाबी थंडी गायब झाल्याचे चित्र समोर आले आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस थंडीला सुरुवात झाली होती. पण अचानक झालेल्या वातावरणातील बदलांमुळे मुंबईसह राज्यात थंडी गायब झाली आहे. बुधवारी (4 डिसेंबर) मुंबई शहरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. यामुळे ऐन हिवाळ्यात आलेल्या या अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. (Cyclone Fengal Effect Mumbai rain and climate changes)

हेही वाचा : Earthquake in East Vidarbha : पूर्व विदर्भाला भूकंपाचे धक्के, तेलंगणात केंद्रस्थान 

मुंबईकरांनी अनुभवला हिवाळ्यात पाऊस

गेल्या आठवड्याभरात मुंबईत पार घसरल्याने थंडीची चहूल लागली होती. पण मंगळवार (3 डिसेंबर) रात्रीपासूनच मुंबईवर काळे ढग जमले होते. त्यानंतर बुधवारी (4 डिसेंबर) पहाटे मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांची अचानक आलेल्या या पावसामुळे तारांबळ उडाली.

वातावरण बदलाचे हे आहे कारण

तामिळनाडूमध्ये सध्या फेंगल चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे. यामुळे कोकणातील हवामानात बदला झाला असून मंगळवारपासून रत्नागिरीसह मुंबई, ठाणे तसेच इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. हवामान खात्याच्या माहितीनुसार, फेंगल चक्रीवादळाचा कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रातून ओमानच्या दिशेने सरकत आहे. यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे. त्यामुळे कोकणात काही ठिकाणी हलका ते मध्यम पर्जन्यमान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यातून गुलाबी थंडी गायब

फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातून गुलाबी थंडी गायब झाली आहे. 3 दिवसांपूर्वी हे वादळ तामिळनाडूमधील पाँडिचेरीच्या (तामिळनाडू) किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे तामिळनाडूसह, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातही मुसळधार पाऊस झाला. यामुळे महाराष्ट्रातील तापमानातही बदल झाल्याचे दिसून आले. नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मंगळवारी हलक्या सरी बरसल्या. तर मुंबईच्या किमान तापमानात घट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.


Edited by Abhijeet Jadhav