घरताज्या घडामोडीNisarga Cyclone: वादळाचं रौद्र रुप धारणं; झाडांसह वीजेचे खांब पडले उन्मळून

Nisarga Cyclone: वादळाचं रौद्र रुप धारणं; झाडांसह वीजेचे खांब पडले उन्मळून

Subscribe

महाराष्ट्राच्या किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळ धडकले आहे. रायगडमधल्या अलिबाग, श्रीवर्धनला चक्रीवादळ ताशी १०० किलोमीटरहून अधिक वेगाने धडकले आहे. सध्या या भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक भागांवर घरची छप्परे उडून गेली आहेत. निसर्ग चक्रीवादळने रौद्ररुप धारण केले असून मुंबईतही याचा प्रभाव दिसून येत आहे. वाऱ्याच्या जोरामुळे काही भागांत विजेचे खांब, मोठी झाडे उन्मळून पडले आहेत.

निसर्ग चक्रीवादळ मुंबई ठाण्याच्या दिशेने सरकले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान वादळामुळे मुंबईतील काळचौकी आणि सायन परिसरातील झाडे कोसळली आहेत. यामुळे काही वाहनांचे आणि दुकानाचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिह्यातील दापोली भागातही वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. लोणारे, रायगड जिल्ह्यातील आंबरले गावातील तीन विजेचे खांब कोसळले आहेत. तर वडचा कोंद गावातील निम्न दाब खांब उन्मळून पडले आहेत.

- Advertisement -

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यांवरही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कोणीही समुद्र किनारी जाऊ नये असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. मात्र चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सहा प्रमुख चौपाट्यांवर जीवरक्षक, मुंबई अग्निशमन दलाचे जवान रेस्क्यू बोट, इतर सर्व बचावाच्या साहित्यांसह तैनात करण्यात आले आहे. मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या समुद्र किनारपट्टीवरील चौपाट्यांवर एकूण ९३ जीवरक्षक तैनात करण्यात आले आहे.


हेही वाचा – वादळ ईशान्य दिशेला वळणार, सहा तासांत तीव्रता कमी होणार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -