घरताज्या घडामोडीCyclone Nisarga: वादळाचा वेग वाढू शकतो, पुढील २-३ तास महत्त्वाचे - बाळासाहेब...

Cyclone Nisarga: वादळाचा वेग वाढू शकतो, पुढील २-३ तास महत्त्वाचे – बाळासाहेब थोरात

Subscribe

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाच्या संकटात अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टाने निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने राज्यात रौद्ररुप धारण केले आहे. अलिबाग चक्रीवादळ धडकले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटाला सामना करण्यासाठी राज्य सरकारने अनेकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. तसेच एनडीआरएफच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातून पुढे सरकले असून मुंबईच्या जवळून नाशिकमार्गे उत्तर महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुंबई जवळून जाताना चक्रीवादळाचा वेग वाढू शकतो, त्यामुळे पुढचे दोन- तीन तास महत्त्वाचे आहेत.

- Advertisement -

काही तासांपूर्वीच निसर्ग चक्रीवादळाने महाराष्ट्रात प्रवेश केलेला आहे. हे वादळ अलिबाग आणि रायगड जिल्ह्यातून पुढे जात आहे. या वादळाचा वेग १०० किमीपेक्षा जास्त असून ११० किमी असल्याचा सांगितले जात आहे. यामुळे झाडे कोसळतायत काही ठिकाणी छतांवरील पत्रे उडतायत. पण प्रशासन अलर्ट आहे. एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. आताच जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून ते सुद्धा चांगले काम करत आहेत. जीवितहानी होऊ नये याची पूर्ण काळजी आपण घेतो आहोत, असे बाळासाहेब थोरातांनी सांगितले आहे.

- Advertisement -

आता निसर्ग चक्रीवादळ कर्जतच्या दिशेने

निसर्ग चक्रीवादळ रायगडमधून कर्जतकडे सरकले आहे. आतापर्यंत सर्वाधिक फटका मुरुड आणि श्रीवर्धनाला बसला आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तातडीने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

 

पुढे ते म्हणाले की, या चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून पडली आहेत, परिणामी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी तारा तुटल्या, विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. प्रशासन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. मुंबईला असलेला चक्रीवादळाचा धोका कमी झालेला असला तरी पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. हे चक्रीवादळ केंद्रबिंदू पासून सरासरी दोनशे किलोमीटर पर्यंत परिणाम करते. निसर्ग चक्रीवादळाची दिशा बघता पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासन दक्ष आहे. नागरिकांनीही काळजी घ्यावी, प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे.


हेही वाचा – Nisarga Cyclone: वादळाचं रौद्र रुप धारणं; झाडांसह वीजेचे खांब पडले उन्मळून


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -