घरमहाराष्ट्रCyclone Tauktae : मुंबईजवळ दोन जहाजं भरकटली; ४१० जणांचे जीव धोक्यात

Cyclone Tauktae : मुंबईजवळ दोन जहाजं भरकटली; ४१० जणांचे जीव धोक्यात

Subscribe

मुंबईजवळ समुद्रात ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे मुंबईजवळ समुद्रात दोन जहाजं भरकटली आहेत. नौदलाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे. या दोन जहाजांपैकी एका जहाजावर २७३, तर दुसऱ्यावर १३७ जण आहेत. या जहाजांच्या मदतीला INS कोच्ची, INS कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत.

या दोन जहाजांपैकी मुंबईजवळ असलेल्या बॉम्बे हायच्या समुद्रात तेल उत्खन्नासंदर्भात काम करणारं एक जहाज आहे. या जहाजावर २७३ जण असल्याची माहिती मिळतेय. यापैकी अनेकजण हे कामगार आणि इंजिनियर्स असल्याची माहिती समोर येतेय. तथापि, या जहाजाने नांगर टाकला नसल्यामुळे चक्रीवादळामुळे आलेल्या वाऱ्यासोबत वाहत गेली. हे जहाज समुद्र किनाऱ्याजवळ असणाऱ्या इतर बोटींना धडकण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

त्याचबरोबर हे जहाज मुंबईच्या किनारपट्टीपासून ७० किमीवर असणाऱ्या बॉम्बे हाय या तेल उत्पादन घेणाऱ्या प्रकल्पालाही धडकू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे तातडीने या बोटीला शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून भारतीय नौदलाने आयएनएस कोच्चीच्या मदतीने या बोटीवरील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

या जहाजाचं सांकेतिक क्रमांक ‘पी ३०५’ असा आहे. या जहाजाकडून मदत मागण्यात आली. त्यानंतर आयएनएस कोच्चीला या बोटीवरील व्यक्तींची सुटका करण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. आयएनएस कोच्चीने सर्च अँड रेस्क्यू ऑप्रेशन हाती घेतल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली आहेआयएनएस कोच्ची दुपारी चारपर्यंत या बोटीजवळ पोहचणं अपेक्षित होतं असंही प्रवक्त्यांनी सांगितलं.

‘जीएल कंट्रक्शन’च्या मालकीचं जहाज भरकटलं

दरम्यान, मुंबईच्या समुद्रामध्ये ‘जीएल कंट्रक्शन’ची मालकीचं असलेलं अजून एक जहाज भरकटलं आहे. या जहाजामध्ये १३७ जण होते. मुंबईच्या किनाऱ्यापासून ८ नॉर्टीकल मैल अंतरावर असणारं हे जहाज समुद्रात भरकटल्यानंतर त्यांनी मदतीसाठी मागणी केली असता नौदलाने आयएनएस कोलकाता ही युद्धनौका मदतासाठी पाठवली आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -