घरताज्या घडामोडीCyclone Tauktae: भाजप कोकणवासीयांच्या मदतीसाठी खंबीर

Cyclone Tauktae: भाजप कोकणवासीयांच्या मदतीसाठी खंबीर

Subscribe

मदतीचे २ ट्रक कोकण येथे रवाना

तौक्ते चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना पुन्हा उभे करण्यासाठी भाजपा सायन कोळीवाडा विधानसभा तर्फे हात मदतीचा या अभियानांतर्गत आमदार कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांच्या पुढाकाराने मदत उपलब्ध केली असून आज सीमेंट पत्रे, गहू, तांदूळ, साखर, औषधे विविध अत्यावश्यक साहित्य असलेले दोन ट्रक कोकणात रवाना करण्यात आले. विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी ट्रक झेंडा दाखवून कोकणात रवाना केले. कोकणात तौक्ते चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबई मध्ये ठिकठिकाणी विधानसभा क्षेत्रात किंवा वॉर्ड स्तरावर मदत पोहचविण्याची भाजपची मोहीम सुरू असल्याचे दरेकर यांनी सांगितले. माध्यमांसोबत बोलताना ते म्हणाले, भाजप मदत करण्यास सक्षम आहे. कालही माझ्या हस्ते पालघर येथे मनिषा ताई यांच्या पुढाकाराने नुकसानग्रस्तांना मदत पोहचवली असून आज २ ट्रक भरून सीमेंट पत्रे व पंधरा किलो असे अन्नधान्य पाठवण्यात आले असून ही मदत एका कुटुंबाला अर्ध्या दिवसासाठी तरी दिलासा देईल असे दरेकर यांनी सांगितले.

भाजप कोकणवासीयांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. निसर्ग चक्रीवादळच्यावेळेही भाजपने मदत केली असून, कोरोनाच्या संकट काळातही भाजप कार्यकर्त्यांनी कोकण येथील रुग्णालयात मदत केली आहे. आताही तौक्ते चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबीयांना पुन्हा उभे करण्यासाठी भाजप मदत करत असल्याचे दिसून येत आहे. पालघर ते सिंधुदुर्ग येथील नुकसानग्रस्त ठिकाणी भाजप मदत पोहचवत असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले. कधीकाळी शिवसेना सामाजिक बांधिलकी जपत आपत्तीच्या काळी मदतीचा हात पुढे करायची परंतु आता शिसेनेची सामाजिक बांधिलकी लोप पावत चाली असल्याचे टीका दरेकर यांनी केली.

- Advertisement -

सत्तेचा मुकुट डोक्यावर आल्यानंतर सेनेची सामाजिक बांधिलकी संपली असावी अशी टीका करत दरेकर म्हणाले, शिवसेनेसाठी हिंदुत्व, सामाजिक बांधिलकी त्यांचं प्राणवायू होता. परंतु आता प्राणवायू संपला आहे. भाजपचा प्राणवायू संपत असल्याची टीका सत्ताधारी करत आहे. त्यामुळे भाजपवर जनतेचा आशीर्वाद असल्यामुळे भाजपकडे खूप प्राणवायू आहे, आपण स्वतः कडे लक्ष घालावे अशी टीका ही दरेकर यांनी केली.

आज शासनाकडून अहवाल जाहीर झाला असून राज्यसरकार तुटपुंजी मदत करत असल्याचे दिसून येत आहे. भाजप हे खपवून घेणार नाही. भाजप राज्य सरकारला मदतीसाठी दबाव आणून मदत करायला भाग पाडेल असेही दरेकर यांनी स्पष्ट केले असून ते म्हणाले, केवळ मागण्याकरून भाजप थांबत नाही तर संपूर्ण भाजप जनतेच्या हितासाठी काम करत आहे. परंतु कोकणाला काय झाले नाही असे वक्तव्य सेना करत असून हे दुर्दैवी आहे. या सर्वातून राज्यसरकारच्या संवेदना दिसून येत आहे. कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम राज्यसरकर करत आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये कोकणवासीयांना भरीव मदत देण्याबाबत निर्णय झाला नाही, तर कोकणचा नागरिक म्हणून मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर उपोषण करेल असा इशारा दरेकर यांनी राज्यसरकारला दिला.

- Advertisement -

हेही वाचा – कोकणातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपकडून ‘फिफ्थ पिल्लर’ उपक्रमाचा प्रारंभ

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -