Cyclone Tauktae: मुख्यमंत्र्यांचा शुक्रवारी तोक्ते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे दौरा

Cyclone Tauktae: the Chief Minister assured help cyclone victim PM Modi sensitive he will definitely help the state

दक्षिण पूर्व अरबी समुद्रात तयार झालेले तोक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae) ओरसले असले तरी राज्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीलगतच्या गावात नुकसान झाले आहे. त्यामुळे तोक्ते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (शुक्रवार) २१ मे रोजी भेट देऊन पाहणी करणार आहेत. तसेच प्रशासनाकडून आढावाही घेणार आहेत

मुख्यमंत्र्यांचा दौरा कसा असणार…

सकाळी ८.३५ वाजता – रत्नागिरी विमानतळ येथे आगमन

०८.४० वा. ‘तोक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक

सकाळी ९.४० वाजता हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन आणि मोटारीने वायरी ता. मालवणकडे प्रयाण

सकाळी १०.१० वाजता वायरी, ता.मालवण येथे ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

सकाळी १०.२५ वाजता मोटारीने मालवण येथे आगमन आणि ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

सकाळी ११.०५ वाजता निवती, ता. वेंगुर्ला येथे ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

या पाहणीनंतर सकाळी ११.३० वाजता चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे मोटारीने आगमन आणि नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक

चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण

दुपारी १२.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन आणि
विमानाने मुंबईकडे प्रयाण


हेही वाचा – Cyclone Tauktae: चक्रीवादळातील मृतांच्या वारसदारांना मिळणार २ कोटींची मदत