घरताज्या घडामोडीCyclone Tauktae: पंतप्रधानांचा गुजरात दौरा, मुख्यमंत्र्यांनी मुंबईची तरी पाहणी करावी, मनसेची टीका

Cyclone Tauktae: पंतप्रधानांचा गुजरात दौरा, मुख्यमंत्र्यांनी मुंबईची तरी पाहणी करावी, मनसेची टीका

Subscribe

संजय राऊत म्हणजे सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमीधील तिवारीच्या पात्राप्रमाणे वावरत असतात.

तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे खुप प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबईतील किनारपट्टीभागातील शहरांचेही नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेत आहेत. मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंनी मुंबईतील नुकसान झालेल्या भागाचा आढावा घेण्यासाठी तरी बाहेर पडावे अशी टीका मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. तर संजय राऊत म्हणजे सेक्रेड गेम्स वेबसिरीच्या तिवारी नावाच्या पात्राप्रमाणे आहेत. ते त्याच थाटात वावरत असतात असा टोला देशपांडे यांनी लगावला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तौत्के चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गुजरातमधील भागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहणी करणार आहेत. या दौऱ्यावर शिवसेनेने केलेल्या टीप्पणीचा संदीप देशपांडे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वतःच्या राज्यावर प्रेम आहे. परंतु आपले मुख्यमंत्री मुंबईत असूनही घराबाहेर पडत नाहीत. त्यांनी निदाल मुंबईतील नुकसानीची पाहणी करावी अशी टीका मनसे नेते संदीप देपांडे यांनी केली आहे.

- Advertisement -

तसेच तौत्के चक्रीवादळामुळे महराष्ट्रात नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावे त्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बाहेर पडतील असा टोले देशपांडे यांनी लगावला आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊतांवरही निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणजे सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमीधील तिवारीच्या पात्राप्रमाणे वावरत असतात. त्यांना स्वतःला अहं ब्रह्मास्मिचा भास होतो आणि त्याच थाटात ते वावरत असतात असा टोलाही राऊतांना संदीप देशपांडे यांनी लगावलाय, महाविकास आघाडीतील नेत्यांनी काहीही केले तरी ते माफ असते परंतु दुसऱ्या कोणी केले तर ते राजकारण ठरते असा टोलाही महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.

संजय राऊत काय म्हणाले

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते कोणत्याही संकटाशी सामना करु शकतात ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींना उमगली असावी. त्यामुळे मोदी महाराष्ट्राचा आढावा न घेता फक्त गुजरातचा आढावा घेणार असावेत. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर असावे यामुळेच मोदींनी गुजरातचा पाहणी दौरा केला असावा अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -