घरमहाराष्ट्रदाऊदच्या 2 हस्तकांना मुंबईतून अटक बॉलीवूडमधून टेरर फंडिंगचा आरोप

दाऊदच्या 2 हस्तकांना मुंबईतून अटक बॉलीवूडमधून टेरर फंडिंगचा आरोप

Subscribe

एनआयएला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मुंबईतील पश्चिम उपनगरातील ओशिवरा भागात रात्री उशिरा छापे टाकले. या छाप्यात अबुबकर शेख आणि शब्बीर या दोघांना तपास यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. हे दोघेही दाऊदचा उजवा हात छोटा शकीलच्या थेट संपर्कात असल्याचे तसेच त्यांनी दाऊदसाठी फायनान्स केल्याचे भक्कम पुरावे एनआयएला मिळाले आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 2 हस्तकांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. आरिफ अबुबकर शेख (59) आणि शब्बीर शेख (51) अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही बॉलीवूडमधील लोकांना टेरर फंडिंग करण्यासाठी धमकावत होते.

एनआयएला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मुंबईतील पश्चिम उपनगरातील ओशिवरा भागात रात्री उशिरा छापे टाकले. या छाप्यात अबुबकर शेख आणि शब्बीर या दोघांना तपास यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. हे दोघेही दाऊदचा उजवा हात छोटा शकीलच्या थेट संपर्कात असल्याचे तसेच त्यांनी दाऊदसाठी फायनान्स केल्याचे भक्कम पुरावे एनआयएला मिळाले आहेत. इंटरपोलने शकीलविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव एनआयएने या दोघांनाही सध्या अज्ञात ठिकाणी ठेवले आहे.

- Advertisement -

छोटा शकील मुंबईबाहेर बसून त्याच्या हाताखालच्या म्होरक्यांकडून खंडणी, ड्रग्ज आणि दहशतवाद पसरवण्याचे काम करीत असल्याचे एनआयएला आढळले आहे. नवी दिल्ली, मुंबईसह देशाच्या विविध भागांत टेरर फंडिंगच्या माध्यमातून पैसे गोळा करीत त्यांनी हिंसाचार भडकावल्या प्रकरणाची एनआयए चौकशी करीत आहे. एनआयएने चार दिवसांपूर्वीच मुंबईत 24 आणि मीरा-भाईंदरमध्ये 5 ठिकाणी छापे टाकून दाऊदची दिवंगत बहीण हसिना पारकरचा मुलगा सलीम फ्रूट आणि दाऊदचा साथीदार छोटा शकीलचा मेहुणा यालाही ताब्यात घेतले होते. याशिवाय एनआयए 20 जणांची चौकशी करीत आहे.

 काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीच्या घरासह अन्य ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाईनंतर आता दाऊद टोळीशी संबंधित दोघांना एनआयएने अटक केली. त्यात आरिफ अबूबकर शेख आणि शब्बीर अबूबकर शेख या दोघांचा समावेश असून अटकेनंतर या दोघांना विशेष सेशन कोर्टाने 20 मेपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या अटकेने एनआरएने दाऊद इब्राहिम व त्याच्या सहकार्‍याविरुद्ध धडक कारवाईला सुरुवात केली असून त्याचे अनेक सहकारी भूमिगत झाले आहेत. दुसरीकडे शेख यांच्या अटकेने दाऊदसह छोटा शकीलला जबरदस्त हादरा बसल्याचे बोलले जाते. सोमवारी 9 मेला एनआरएच्या एका विशेष पथकाने दाऊद इब्राहिमशी संबंधित नातेवाईक, त्याच्या सहकार्‍याच्या मुंबई आणि ठाण्यातील 29 ठिकाणी अचानक छापे टाकले होते.

- Advertisement -

या छाप्यात या अधिकार्‍यांनी अनेक धक्कादायक कागदपत्रांसह इलेक्ट्रॉनिक दस्तावेज, कॅश आणि घातक शस्त्रसाठा सापडला होता. या सर्व मुद्देमाल ताब्यात घेतल्यांनतर या पथकाने तपासाला सुरुवात केली होती. चौकशीदरम्यान आरिफ आणि शब्बीर यांचे नाव समोर आले होते. ते दोघेही अंधेरीतील ओशिवरा परिसरात राहत होते. त्यामुळे या दोघांना गुरुवारी या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर या दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर शुक्रवारी दुपारी त्यांना विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना शुक्रवार 20 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ते दोघेही दाऊद आणि छोटा शकीलचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जात असून ते त्यांच्या संपर्कात असल्याचा संशय या अधिकार्‍यांना आहे. दाऊद इब्राहिमने आगामी काळात काही राजकीय नेत्यासह व्यावसायिक आणि व्यापार्‍यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यासाठी टोळीकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकासह घातक शस्त्रांची जमवाजमव सुरु होती. दाऊद इब्राहिमने या हत्येसह मुंबईसह दिल्लीत मोठ्या प्रमाणात घातपात घडविण्याचा कट रचल्याचेही आतापर्यंतच्या चौकशीतून उघडकीस आले होते.

या माहितीनंतर एनआयएच्या अधिकार्‍यांनी दाऊदशी संबंधित व्यक्तीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान या कारवाईमुळे दाऊदसह छोटा शकीलला जबदस्त हादरा बसल्याचे बोलले जाते. दाऊद आणि छोटा शकीलशी संबंधित आणि त्यांच्या संपर्कात राहून खंडणी वसुली, ड्रग्ज तस्करी आणि हवालाच्या गुन्ह्यांत सहभागी असलेले अनेक सहकारी पळून गेले आहे. अटकेच्या भीतीने ते सर्वजण अंडरग्राऊंड झाल्याचे बोलले जाते.

सोमवारी एनआयएच्या कारवाईनंतर काहींना या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यात छोटा शकीलचा साडू सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फु्रट, बिल्डर अजय गोसालिया, गुड्डू पठाण, कय्युम शेखसह अठराजणांचा समावेश होता. या सर्वांच्या चौकशीतून काही धक्कादायक खुलासे झाले होते. त्यात शब्बीर आणि आरिफने अनेक धक्कादायक माहिती एनआयए अधिकार्‍यांना दिली होती. या दोघांनी दाऊदसाठी मोठ्या प्रमाणात खंडणी वसुली केली असून हा पैसा दहशतवादी कारवायासाठी पाठविल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना गुरुवारी या गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे. आठ दिवसांची एनआयए कोठडी मिळाल्यामुळे त्याची आता एनआयएकडून कसून चौकशी होणार आहे. आगामी दिवसांत दाऊदशी संबंधित आणखीन काहीजण एनआयएच्या रडारवर असून काही टिम वेगवेगळ्या शहरात पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -