घरताज्या घडामोडीDabholkar murder case : नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणात मोठी घडामोड, ९ वर्षानंतर...

Dabholkar murder case : नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणात मोठी घडामोड, ९ वर्षानंतर पटली खुन्यांची ओळख

Subscribe

दाभोळकरांना मारण्यासाठी दोन जण मोटार सायकलवरुन आले आणि त्यांना गोळ्या घातल्या असल्याची साक्ष त्यांनी कोर्टात दिली आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांचा गोळीबार करुन खून करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून दाभोळकरांच्या खुन्यांना पकडण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणी चौकशी अद्याप सुरुच आहे. ९ वर्षानंतर आता दोन प्रत्यक्षदर्शींद्वारे खुन्यांची ओळख पटली आहे. यामुळे या प्रकरणात आता मोठी घडमोड घडली असल्याचे समोर आले आहे. दाभोळकर यांच्यावर दोघांनी गोळीबार केला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी न्यायालयात दिली आहे. आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनीच दाभोळकरांना गोळ्या घातल्या असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

सरकारी वकील प्रकाश सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकामध्ये सफाई काम करणाऱ्या किरण कांबळे (४६) यांनी कोर्टात साक्ष देताना सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांची ओळख पटवली आहे. दाभोळकरांना मारण्यासाठी दोन जण मोटार सायकलवरुन आले आणि त्यांना गोळ्या घातल्या असल्याची साक्ष त्यांनी कोर्टात दिली आहेत.

- Advertisement -

पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाच्या दुभाजकावर सकाळच्या सुमारास काम संपवून प्रत्यक्षदर्शी किरण कांबळे आणि त्यांच्यासह एक स्त्री असे दोघे बसले होते. यावेळी अचानक फटाके फुटल्याचा आवाज आला, आवाजाच्या दिशेने पाहिले तेव्हा एका व्यक्तिला दोघे गोळ्या झाडत असताना दिसले असल्याचे सरकारी वकीलांनी सांगितले.

यानंतर कांबळे ज्या दिशेला बसले होते त्या दिशेला आरोपी पळाले. तिथे जवळच असलेल्या चौकीजवळ दोघांनी मोटार सायकल पार्क केली होती. मोटार सायकलवर बसून घटनास्ठळावरुन पलायन केले. आरोपी पळाल्यानंतर कांबळे घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तिकडे (दाभोळकर) पोहोचले आणि पुढच्या त्यांच्या कामासाठी गेले असल्याचे कांबळेंनी कोर्टात सांगितले आहे.

- Advertisement -

सरकारी वकील प्रकाश सुर्यवंशी म्हणाले की, उलटतपासणीदरम्यान कांबळे यांना पोलिसांच्या जबाबात उशीर झाल्याबद्दल विचारणा करण्यात आली. २३ मार्च रोजी पुन्हा चौकशी होणार आहे. बुद्धिवादी आणि अंधश्रद्धाविरोधी कार्यकर्ते दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.


हेही वाचा : नारायण राणेंच्या अधीश बंगल्याविरोधात पालिकेची दुसरी नोटीस, अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी १५ दिवसांचा अल्टीमेटम

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -