घरमहाराष्ट्रकोथरूडमध्ये बंदुकीच्या धाकावर दीड किलो सोने चोरले

कोथरूडमध्ये बंदुकीच्या धाकावर दीड किलो सोने चोरले

Subscribe

यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. दुकानातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. 

पुण्यातील कोथरूड येथील पेठे ज्वेलर्सच्या दुकानात बंदुकीच्या धाकावर लाखो रुपये किंमतीचे दीड किलो सोने चोरून चोरांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे. सायंकाळी ४.३०च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. दुकानातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.

पुणे: बंदुक दाखवून ज्वेलर्स दुकान लुटले

कोथरूडमध्ये पेठे ज्वेलर्स दुकानात बंदुक दाखवत दीड किलो सोने पळवले

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ನವೆಂಬರ್ 24, 2019

- Advertisement -

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी ४.३०च्या सुमारास कोथरूड येथील आनंदनगर चौकात असलेल्या पेठे ज्वेलर्स या दुकानात दोघेजण दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी त्यांच्याजवळील बंदुकीच्या धाकावर सोने लुटण्यास सुरुवात केली. यावेळी काही कामगारांनी चोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी चोरट्यांनी बंदुकीचे दोन राऊंड फायर केले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. सोने लुटल्यानंतर चोरांनी चांदणी चौकाच्या दिशेने पलायन केले, असे तेथे उपस्थित काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान दुकानातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरांचा शोध घेण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -