ठाकरेंना धक्का! कामकाज सल्लागार समितीत चौधरींऐवजी भुसे आणि सामंतांचा समावेश

विधिमंडळांचं पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ९ ऑगस्ट रोजी आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी शिंदे गटातील ९ आमदारांनी तर, भाजपच्या ९ आमदारांनी गोपनियता आणि मंत्रिपदाची शपथ घेतली.

uddhav thackeray

मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची (Working Advisory Committee)बैठक उद्या होणार आहे. या बैठकीत शिवसेनेच्या सदस्याला समाविष्ट करून घेण्याकरता अजय चौधरी (MLA Ajay Chaudhari) यांनी काल, ९ ऑगस्ट रोजी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेची ही मागणी फेटाळली आहे. दरम्यान, या बैठकीत शिंदे गटाकडून दादा भुसे (Dada Bhuse)आणि उदय सामंत (Uday Samant) यांना समाविष्ट करून ठाकरेंना धक्का दिला आहे. (Dada bhuse and uday samant invited for working advisory committee)

विधिमंडळांचं पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ९ ऑगस्ट रोजी आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी शिंदे गटातील ९ आमदारांनी तर, भाजपच्या ९ आमदारांनी गोपनियता आणि मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्र्यांना आपल्या विभागाची माहिती व्हावी, मागण्या समजाव्यात याकरता थोडा वेळ मिळावा म्हणून प्रस्तावित १० ऑगस्टचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपर्यंत ढकलण्यात आलं.

हेही वाचा – विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीत शिवसेनेचा सदस्य नेमा, अजय चौधरींची मागणी

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाआधी विधिमंडळाची कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित केली जाते. या बैठकीत सर्व पक्षातील एक सदस्य घेतला जातो. त्यासाठी या समितीवरील सदस्यांच्या नियुक्तीबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह पक्षाच्या गटनेत्यांना सचिवांकडून पाठवण्यात आलं होतं. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तसे कोणतेही पत्र मिळाले नाही. त्यामुळे यासंदर्भात शिवसेना गटनेते अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांनी विधिमंडळ प्रधान सचिवांना पत्र लिहिले. ही कृती नियमबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचे अजय चौधरी यांनी या पत्रात म्हटलं. अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून समितीच्या बैठकीला निमंत्रित करावे तसेच समितीवर सदस्य नियुक्तीसाठी पत्र द्यावे, अशी मागणी अजय चौधरी यांनी केली होती.

हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारचे तीन मोठे निर्णय, मुंबई मेट्रो 3 च्या सुधारित प्रस्तावास मान्यता

मात्र, अजय चौधरींची ही मागणी फेटाळण्यात आली आहे. दरम्यान, चौधरींची ही मागणी फेटाळण्यात आली असली तरीही त्यांना आणखी एक धक्का देण्यात आलाय. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीत शिंदे गटाकडून दादा भुसे आणि उदय सामंत यांना समाविष्ट करून घेण्यात आले आहे.