Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रDada Bhuse on virar news : उत्तरपत्रिका जळल्या असल्या तरी नो टेन्शन, काय म्हणाले दादा भुसे?

Dada Bhuse on virar news : उत्तरपत्रिका जळल्या असल्या तरी नो टेन्शन, काय म्हणाले दादा भुसे?

Subscribe

विरार : विरारमध्ये एका शाळेतील शिक्षिकेने बारावीचे पेपर तपासणीसाठी घरी घेऊन गेले असता घरी लागलेल्या आगीत ते जळाल्याचे समोर आले होते. यावरून शिक्षण विभागावर विद्यार्थी तसेच पालकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. या सर्व प्रकरणावर आता शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्या 175 विद्यार्थ्यांना चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. कारण, त्या उत्तरपत्रिकेच्या गुणपत्रिका तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची चिंता थोड्याफार प्रमाणात मिटली असली तरीही बारावीच्या पेपर संदर्भातील काही शिक्षकांचा हलगर्जीपणा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम करू शकतो, अशी चिंता पालकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणी विरारमधील प्राचार्य आणि शिक्षकांवर बोळींज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तरपत्रिका घरी नेण्याची परवानगी नसतानाही बेकायदेशीररित्या या उत्तरपत्रिका घरी नेण्यात आल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Dada Bhuse on Virar exampaper get fire in teachers home)

हेही वाचा : ICC Champions Trophy : आयसीसी म्हणजे आता इंडियन क्रिकेट बोर्ड, वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधाराचे गंभीर आरोप

सदर घटनेवर बोलताना शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले की, “शिक्षिका घरी उत्तरपत्रिका घेऊन गेल्या होत्या. हे कायद्याने चुकीचेच आहे. उत्तरपत्रिका जळाल्या असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पण विद्यार्थ्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण त्या उत्तरपत्रिकांची तपासणी होऊन गुणपत्रिका तयार आहेत.” त्यांनी केलेल्या या विधानामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पण, काही दिवसांपूर्वी एक शिक्षक चालत्या बसमध्ये बारावीचे पेपर तपासात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अशा घटनांवर आता शिक्षण विभाग काय निर्णय घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम गंगुबाई अपार्टमेंट बोलींज नानभाट रोड येथील आगाशी परिसरात राहणाऱ्या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली. या शिक्षिकेने 12 वी वाणिज्य शाखेचे पेपर पुनर्तपासणीसाठी घरी आणले होते. यावेळी काही कारणस्तव त्यांनी सोफ्यावर पेपर ठेवले होते. पण त्यानंतर शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले. त्यांचे घर बंद असताना अचानक शॉर्टसर्किट झाले आणि घरामध्ये आग लागली. त्यामध्ये घरातील इतर सामानासह बारावीचे पेपरही जळाले. उत्कर्ष शाळेतील हे पेपर असून एकूण 175 उत्तर पत्रिका जळाल्याचे समोर आले.