घरताज्या घडामोडीसदा सरवणकर यांचा फोटो असलेला बॅनर फाडला; मुंबईत शिवसैनिक आक्रमक

सदा सरवणकर यांचा फोटो असलेला बॅनर फाडला; मुंबईत शिवसैनिक आक्रमक

Subscribe

शिवसेनेचे निष्ठावंत सैनिक एकनाथ शिंदे यांनी बंडाळी पुकारल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे अनेक आमदारांनी बंड पुकारत शिंदे गटात सहभाग घेतला. त्यानंतर मुंबईतील शिवसेना भवनात त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

शिवसेनेचे निष्ठावंत सैनिक एकनाथ शिंदे यांनी बंडाळी पुकारल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे अनेक आमदारांनी बंड पुकारत शिंदे गटात सहभाग घेतला. त्यानंतर मुंबईतील शिवसेना भवनात त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी दादरमधील शिवसेनेचे आमदार सदा सरवणकरही उपस्थित होते. सरवणकर यांनीही गद्दारांना क्षमा नाही, असा नारा देत बंडखोर आमदारांविरोधात रोष व्यक्त केला होता. परंतू, या आदोलनाच्या तिसऱ्याच दिवशी स्वत: सदा सरवणकर यांनी बंड पुकारला. त्यामुळे संतप्त दादरमधील शिवसैनिकांनी त्यांचा बॅनर फाडला आणि ‘सदा सरवणकर गद्दार’ असल्याचा नारा दिला. (dadar mahim shivsena MLA sada sarvankar poster torn by shivsena)

दादर-माहीम मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांचे पोस्टराला काळे फासून फाडण्यात आले आहे. तसेच, सदा सरवणकर यांचे वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले पोस्टर उतरून त्या ठिकाणी आता बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो असलेले पोस्टर आता पोस्टर वेगवेगळ्या ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे भावूक

दरम्यान, सदा सरवणकर हे कट्टर शिवसैनिक असून ते उद्धव ठाकरेंची बाजू सोडणार नाहीत, असा विश्वास होता. मात्र मुंबईतील पुन्हा तीन आमदार गुवाहाटीत गेल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी थेट या आमदारांच्या पोस्टरला काळे फासून फाडले. सध्यस्थितीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३७ आमदार असून ते आसामच्या गुवाहटी येथील रेडिसेन्स ब्लू या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – संकटाच्या काळात कोणीही विचारपूस केली नाही, यामिनी जाधवांचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -