घरताज्या घडामोडीखुशखबर: शनिवारपासून दररोज धावणार 'दादर-सावंतवाडी' विशेष ट्रेन

खुशखबर: शनिवारपासून दररोज धावणार ‘दादर-सावंतवाडी’ विशेष ट्रेन

Subscribe

कोकणवासियांसाठी कोकण रेल्वेने एक खुशखबर दिली आहे. २६ सप्टेंबरपासून मुबंई ते कोकण प्रवासासाठी दादर ते सावंतवाडी अशी रोज विशेष ट्रेन सोडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. मध्य रेल्वेकडून या विशेष रेल्वेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊननंतर गावी आणि मुंबईत खोळंबलेल्या नागरिकांसाठी हा सर्वात मोठा दिलासा असल्याचे सांगितले जात आहे. अनलॉकनंतर राज्याचे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून शासनाने सुध्दा राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला मान्यता दिली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने पंचवटी एक्स्प्रेस सुरु केल्यानंतर आता कोकणातील नागरिकांसाठी मॉन्सूनच्या वेळापत्रकानुसार दररोज दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

अनलॉकअंतर्गत राज्य सरकारने नुकतेच आंतरजिल्हा प्रवासाला मुभा दिली आहे. त्यानुसार २ सप्टेंबरपासून अनेकांनी जिल्ह्यांतर्गत रेल्वे प्रवासासाठी बुकींग सुरू केले. त्यानुसार मध्य रेल्वेने मुंबई ते मनमाड नंतर दादर-सावंतवाडी ट्रेन सुरु केली आहे. 01003 ही विशेष गाडी दादरहून दररोज रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी सुटणार आहे. तर 01004 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दररोज सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी मुंबई साठी सुटणार आहे. या दोन्ही विशेष गाड्या २६ सप्टेंबर २०२० ते ३१ आक्टोबर २०२० पर्यंत धावणार आहे. या दोन्ही विशेष गाडयांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण , सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळला थांबे असणार आहे. या विशेष गाड्यांचा डब्याची संरचना एक एसी -२ टायर, चार एसी – ३ टायर, ८ स्लीपर क्लास, ६ द्वितीय श्रेणी सिटींग राखीव डबे असणार आहे.

- Advertisement -

नॉन-मॉन्सून वेळापत्रक

कोकण रेल्वे मार्गवर १ नोव्हेंबर २०२० पासून नॉन-मॉन्सून वेळापत्रक लागू होते. त्यानुसार 01003 विशेष गाडी दादरहून दररोज रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी सकाळी 10.40 वाजता पोहोचेल. 01004 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दररोज सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दादरला पहाटे 6 वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -