Live Update : खासदार राजन विचारेंच्या दहीहंडीला आदित्य ठाकरेंची उपस्थिती

political update cm eknath shinde guwahati Karnataka Maharashtra border row shraddha murder case 26 11 Mumbai Attack

खासदार राजन विचारेंच्या दहीहंडीला आदित्य ठाकरेंची उपस्थिती


मुंबईतील दहीहंडी उत्सवात 78 गोवींदा जखमी


तुमचं सरकार आलंय, सण जोरातच साजरे होणार – दहीकाला उत्सवात फडणवीसांचं वक्तव्य


जखमी झालेल्या गोविंदांची विचारपूस करण्यासाठी माजी महापौर किशोरी पेडणेकर पोहोचल्या के ई एम रुग्णालयात


ठाण्यात जय जवान गोविंदा पथकाने रचले 9 थर


बोरिवलीतील प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात शहाजी बापू पाटलांची एन्ट्री


आजचा दिवस आनंदाचा: आज टोमणे, टीका नकोत – आदित्य ठाकरे यांचं विरोधकांना उत्तर


शिवसेना भवन परिसरातील निष्ठा दहीहंडी उत्सवाला आदित्य ठाकरे उपस्थित तर किशोरी पेडणेकर यांच्या कडून महिला गोविंदा पथकाला 11 हजार रुपयांचे बक्षीस


मागाठाण्यातील दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार आमदार सुनील राणे यांच्या दहीहंडी उत्सवात दाखल


पुण्यात एटीएसची मोठी कारवाई; एका दहशतवाद्याला अटक


गृहनिर्माण प्रकल्पाबाबद तारीख तुम्ही ठरवा मान्यता मी देईन; घाटकोपरमधील दहीकाला उत्सवात फडणवीसांचं वक्तव्य


गोविंदा जोरात, गणपती जोरात आणि नवरात्रही जोरात; राज्यात सर्व सणवार उत्सहात आणि आनंदात – दवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला


आपलं सरकार आल्यावर सगळं खुलं होतं – देवेंद्र फडणवीसांचं घाटकोपर मधील दहीहंडी उत्सवातून वक्तव्य


टेंभीनाका म्हणजे दहीहंडीची पंढरी – एकनाथ शिंदेंचं ठाण्यातील गोपाळकाला उत्सवात वक्तव्य


ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीला गोविंदा पथकांचा उदंड प्रतिसाद


ठाण्यातील टेंभीनाका इथल्या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल


वरळी जांबोरी मैदान येथील दहीहंडी उत्सवात देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांचा सहभाग


वरळीतील दहीहंडीच्या उत्सहात आदित्य ठाकरे सहभागी


मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान पिरॅमिड तयार करताना 12 गोविंदा जखमी. त्यापैकी 5 जणांवर उपचार झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर 7 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे


बोरिवलीतील साई बाबा नगरमध्ये 4 मजली गीतांजली इमारत कोसळली


मागाठाण्यातून आमदार प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडी उत्सवाला सुरुवात


भांडुपमध्ये जय जवान गोविंदा पथकाकडून 9 थरांची सलामी


टेंभी नाक्याच्या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित


ठाण्यात मनसेच्या दहीहंडीला गोविंदा पथकांची गर्दी


युवासेना कार्यकारिणी आयोजित निष्ठा हंडीहंडी उत्सवाला शुक्रवार दि.19 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसेना भवन येथे उपस्थित राहणार आहेत.


दादरमध्ये आयडियलची दहीहंडी तर ठाण्यात मनसेच्या दहीहंडीचा उत्साह


दहीहंडीच्या उत्सवात राजकीय शक्तिप्रदर्शन


कळवा रेल्वे स्थानक परिसरात एसी लोकल विरोधात प्रवाशांचे आंदोलन


जय जवान गोविंदा पथक 10 थरांचा विक्रम रचणार ?


गोविंदा रे गोपाळा: तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्र अनुभवणार थरांचा थरार; गोविंदा पथके विक्रम रचण्यास सज्ज


दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयचे छापे


आज ठाण्यात दहीहंडीचा उत्साह आहे. असं असतानाच ठाण्यात पोस्टरवॉर रंगलं आहे. शिंदे गटाने ठाण्यात पोस्टरबाजी केली असून टेंभी नाक्यावर उद्धव ठाकरेंवर टीका करणारे पोस्टर झळकावले आहे.


कोरोना संसर्गामुळे दोन वर्षे दहीहंडीचा उत्सव झाला नव्हता. मात्र, आज दोन वर्षांनी पहिल्यांदा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. त्यासाठी मुंबईसह ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष आहे. गोविंदा पथके सज्ज झाले असून थोड्याचवेळात थरांवर थर लागायला सुरुवात होणार आहे.