घरमहाराष्ट्रDahisar Firing : अपयशी फडणवीसांनी राजीनामा द्यावा, संजय राऊत यांची मागणी

Dahisar Firing : अपयशी फडणवीसांनी राजीनामा द्यावा, संजय राऊत यांची मागणी

Subscribe

मुंबई : राज्यात खुलेआम गोळीबाराच्या घटना घडत आहेत. आधी उल्हासनगर, नंतर चाळीसगाव आणि आता दहिसर येथे झालेल्या अशा घटनांवरून विरोधक आक्रमक झाले आहे. महाराष्ट्रात गुंडा राज असल्याचे सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, सपशेल अपयशी ठरलेले उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा – Dahisar Firing : आपल्याकडे ‘लॉ’ आहे, पण…; राज ठाकरेंचा व्हिडीओ शेअर करत मनसेचे सूचक ट्वीट

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यातील एका जमिनीच्या वादातून 2 फेब्रुवारी रोजी उल्हासनगर हिललाइन पोलीस ठाण्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याणमधील पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी गणपत गायकवाड हे पोलीस कोठडीत आहेत. तर, महेश गायकवाड यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यापाठोपाठ, चाळीसगावमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्यावर कारमधून आलेल्या पाच जणांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना 7 फेब्रुवारी संध्याकाळी घडली होती. या हल्ल्ल्यात बाळासाहेब मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

त्यापाठोपाठ दहिसर येथे गुरुवारी रात्री शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. मॉरिस नोरोन्हाने अभिषेक घोसाळकर यांना आपल्याच कार्यालयात एका कार्यक्रमासाठी बोलावले होते. यावेळी अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत फेसबुक लाइव्ह केल्यानंतर मॉरिसने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मॉरिसने नंतर स्वत:वरही चार गोळ्या झाडून आत्महत्या केली.

हेही वाचा – ABHISHEK GHOSALKAR : “आज लोग बहोत सरप्राइज होंगे…”; अभिषेक यांच्या हत्येपूर्वी दोघांत काय संवाद झाला

यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झाला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस नोरोन्हा चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर गेला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याला भेटले आणि मॉरिस याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले! त्यानेच अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला, असे खासदार राऊत यांनी म्हटले आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी ठऱले असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा – Abhishek Ghosalkar : घोसाळकरांना मुलाखतीसाठी कसे नेले; नेमके काय झाले? प्रत्यक्षदर्शीने महिलेने सांगितला घटनाक्रम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -