घरमहाराष्ट्रDahisar Firing : महाराष्ट्र सरकारची अभिनव योजना..., जितेंद्र आव्हाड यांचे खोचक ट्वीट

Dahisar Firing : महाराष्ट्र सरकारची अभिनव योजना…, जितेंद्र आव्हाड यांचे खोचक ट्वीट

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रात आठवड्याभरात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. उल्हासनगर, चाळीसगाव आणि दहिसर येथे लागोपाठ घडलेल्या घटनांमध्ये राजकीय क्षेत्रातील व्यक्तीच लक्ष्य ठरल्या आहेत. यावरून, ‘महाराष्ट्राचा बिहार झाला, असे म्हणण्यात आता काहीच अर्थ उरला नाही. कारण, महाराष्ट्राने बिहारला खूप मागे सोडले आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.

हेही वाचा – Dahisar Firing : आपल्याकडे ‘लॉ’ आहे, पण…; राज ठाकरेंचा व्हिडीओ शेअर करत मनसेचे सूचक ट्वीट

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यातील एका जमिनीच्या वादातून 2 फेब्रुवारी रोजी उल्हासनगर हिललाइन पोलीस ठाण्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याणमधील पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्यापाठोपाठ, चाळीसगावमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्यावर कारमधून आलेल्या पाच जणांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना 7 फेब्रुवारी संध्याकाळी घडली होती. तर, दहिसर येथे गुरुवारी (8 फेब्रुवारी) रात्री शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. मॉरिस नोरोन्हाने अभिषेक घोसाळकर यांना आपल्याच कार्यालयात एका कार्यक्रमासाठी बोलावले होते. यावेळी अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत फेसबुक लाइव्ह केल्यानंतर मॉरिसने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मॉरिसने नंतर स्वत:वरही चार गोळ्या झाडून आत्महत्या केली.

- Advertisement -

यावरून विरोधक आक्रमक झाले आहे. राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राचा बिहार झाला, असे म्हणण्यात आता काहीच अर्थ उरला नाही. कारण, महाराष्ट्राने बिहारला खूप मागे सोडले आहे. गुंडांनी जणू महाराष्ट्र आपल्या मुठीत बंदिस्त करून टाकला आहे. हतबल सरकार उघड्या डोळ्यांनी सारे काही पाहत आहे. पोलिसांची दहशतच संपली आहे. पोलीस दलात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. पोलिसांवर फक्त विरोधकांना संपवण्याची जबाबदारी आहे; कायदा आणि सुव्यवस्था गेली खड्ड्यात, असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.

इतक्या घटना घडूनही सरकारला लाज कशी वाटत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. जनता हे सगळे उघड्या डोळ्यांनी बघत आहे; जनतेमधील रोष वाढत आहे. पण, याला आपण जबाबदार आहोत, हे सरकारने लक्षात घ्यावे, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, त्यांनी आणखी एक ट्वीट करत, महाराष्ट्र सरकारची अभिनव योजना, मागेल त्याला ‘बुलेटप्रूफ जॅकेट’, अशी खोचक टीकाही केली आहे.

हेही वाचा – Dahisar Firing : अपयशी फडणवीसांनी राजीनामा द्यावा, संजय राऊत यांची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -