घरमहाराष्ट्रDahisar Firing : आपल्याकडे 'लॉ' आहे, पण...; राज ठाकरेंचा व्हिडीओ शेअर करत...

Dahisar Firing : आपल्याकडे ‘लॉ’ आहे, पण…; राज ठाकरेंचा व्हिडीओ शेअर करत मनसेचे सूचक ट्वीट

Subscribe

मुंबई : उल्हासनगरमध्ये थेट पोलीस ठाण्यातच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री दहिसरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – Abhishek Ghosalkar : घोसाळकरांना मुलाखतीसाठी कसे नेले; नेमके काय झाले? प्रत्यक्षदर्शीने महिलेने सांगितला घटनाक्रम

- Advertisement -

मॉरिसने माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना आपल्याच कार्यालयात एका कार्यक्रमासाठी बोलावले होते. यावेळी अभिषेक घोसाळकर यांनी मॉरिससोबत फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. संवाद संपल्यानंतर अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिसने गोळ्या झाडल्या. गुरुवारी रात्री 7.45 वाजताच्या सुमारास घडलेली ही सर्व घटना फेसबुक लाइव्हमुळे चित्रीत झाली आहे. अभिषेक घोसाळकर यांना तत्काळ करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. तसेच हल्लाखोर मॉरिसने स्वत:वर चार गोळ्या झाडून आत्महत्या केली.

या घटनेचे पडसाद उमटत आहे. मनसेने राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात राज्यातील परिस्थितीवर राज ठाकरे भाष्य करताना दिसत आहेत. आपल्या देशात ‘लॉ’ आहे फक्त ‘ऑर्डर’ नाही. ऑर्डरची गरज आहे, त्यामुळे या गोष्टी सुरळीत होऊ शकतात. मुंबईसह महाराष्ट्र पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. त्यांच्या हातात 48 तास आणि सांगा की, मला महाराष्ट्र साफ करून द्या, असे राज ठाकरे म्हणताना दिसतात.

- Advertisement -

हेही वाचा – ABHISHEK GHOSALKAR : “आज लोग बहोत सरप्राइज होंगे…”; अभिषेक यांच्या हत्येपूर्वी दोघांत काय संवाद झाला

पोलिसांना सगळ्या गोष्टी माहीत असतात, पण ऑर्डर नसतात, मग रिस्क कोण घेईल? पोलिसांनी एखादी भूमिका घेतल्यानंतर समजा त्यांना जेलमध्ये जायला लागत असेल तर, ते का जातील जेलमध्ये? कोणसाठी जातील? वर बसलेलाच माणूस टेम्पररी आहे. त्याच्यासाठी याने कायमस्वरुपी जेलमध्ये जायचे? याला काही अर्थ आहे का?, असे राज ठाकरे म्हणतात. हा व्हिडीओ शेअर करताना मनसेने म्हटले आहे की, राज्यातील बेछूट गोळीबार, टोळीयुद्ध, गुन्हेगारांचा मुक्त संचार, कोयता गॅंगचा उच्छाद, मुलींचे अपहरण हे गुन्हे थांबवायचे असतील तर महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या.

हेही वाचा – Dahisar Firing : मुख्यमंत्र्यासोबत आरोपी मॉरिसचा फोटो पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांकडून संताप; म्हणाले….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -