घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकौटुंबिक वादाला कारणीभूत असल्याच्या संशयातून दाजीचे मेहुणीवर विळ्याने वार

कौटुंबिक वादाला कारणीभूत असल्याच्या संशयातून दाजीचे मेहुणीवर विळ्याने वार

Subscribe

नाशिक : कौटुबिक वादातून जावई व मुलाने मानलेल्या मुलीवर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या हल्ल्यात महिला गंभीर दुखापत झाली असून, तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना सोमवारी (दि.२७) सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेदरम्यान दिंडोरी रोडवर घडली. पोलिसांनी जावई व मुलास ताब्यात घेतले आहे.

आरती वालझाडे असे गंभीर दुखापत झालेल्या महिलेचे नाव आहे. दाजी मनोहर सोमनाथ मोंढे, मनीष एकनाथ लोखंडे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. अरुणा एकनाथ लोखंडे (रा. अश्वमेध नगर) यांनी पंचवटी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अरुणा लोखंडे यांचा जावई मनोहर सोमनाथ मोंढे याचे पत्नीसोबत कौटुंबिक वाद आहेत. या वादास आरती वालझाडे कारणीभूत असल्याचा आरोप करीत जावई मनोहर मोंढे व मुलगा मनीष एकनाथ लोखंडे याने आरतीवर विळ्याने हल्ला केला.

- Advertisement -

हल्ल्यात आरती वालझाडे यांना गंभीर दुखापती झाली आहे. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन जखमीची चौकशी केली. पंचवटी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -