Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी मुंबईतील दादर परिसरात झाड कोसळून वाहनांचे नुकसान

मुंबईतील दादर परिसरात झाड कोसळून वाहनांचे नुकसान

Subscribe

दादर (प.), रानडे रोड येथे सोमवारी सकाळच्या सुमारास भेंडीचे झाड अचानक कोसळले. या घटनेत एक चार चाकी गाडी व बाईकचे नुकसान झाले. तर रस्ते वाहतुकीला काही वेळ अडथळा निर्माण झाला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

प्राप्त माहितीनुसार, दादर (प.), रानडे रोड येथील शुश्रूषा रूग्णालयनजीक असलेले भेंडीचे झाड सोमवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अचानक कोसळले. हे झाड तेथे पार्क केलेल्या एका चार चाकी व दुचाकी वाहनांवर कोसळल्याने या वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने सकाळी लवकर घटना घडल्याने रस्त्यावर जास्त रहदारी नव्हती. शुश्रूषा रुग्णालय परिसरात नागरिकांची सतत ये-जा असते.

- Advertisement -

मात्र हीच घटना सकाळी १० च्या सुमारास घडली असती तर त्यात काही व्यक्ती सापडून जीवितहानी होण्याची अथवा अधिक प्रमाणात व्यक्ती जखमी होण्याची शक्यता नाकारता आली नसती. सदर घटना घडल्यावर पालिकेच्या जी/ उत्तर प्रभाग कार्यलयातील उद्यान खात्याच्या अधिकारी व कर्मचारी यांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू केले. त्यामुळे अवघ्या अर्धा ते पाऊण तासात रस्त्यावर पडलेले झाड व त्याच्या मोठया फांद्या या कापून रस्ता रहदारीसाठी तात्काळ मोकळा करण्यात आला.

मात्र सदर कोसळलेले झाड हे भेंडीचे असून त्याचे खोड खराब झाले होते. सध्या पावसाचे दिवस असल्याने ते झाड अचानकपणे कोसळले, अशी माहिती पालिका उद्यान खात्याकडून मिळाली.


- Advertisement -

हेही वाचा : राज्यात २४ तासात २ हजार ३६९ नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर मुंबईतील परिस्थिती काय?


 

- Advertisment -