घरताज्या घडामोडीपाटील आडनावावरून गौतमी पुन्हा अडचणीत; वाचा सविस्तर

पाटील आडनावावरून गौतमी पुन्हा अडचणीत; वाचा सविस्तर

Subscribe

"सबसे कातिल गौतमी पाटील'' हा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात गाजला आहे. गौतमी पाटील हिच्या डान्सला आणि तिच्या कार्यक्रमांना विरोध होत असला तरी तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कुठेही गप्पा रंगत असतील आणि त्यामध्ये गौतमीचं नाव आलं तर, त्यावेळी विषय चांगलाच रंगतो. मात्र आता गौतमी पाटीलबाबतची माहिती समोर आली आहे.

“सबसे कातिल गौतमी पाटील” हा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात गाजला आहे. गौतमी पाटील हिच्या डान्सला आणि तिच्या कार्यक्रमांना विरोध होत असला तरी तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कुठेही गप्पा रंगत असतील आणि त्यामध्ये गौतमीचं नाव आलं तर, त्यावेळी विषय चांगलाच रंगतो. मात्र आता गौतमी पाटीलबाबतची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, गौतमी हिच्या ‘पाटील’ या आडनावावरून पुण्यात बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. (Dancer Gautami Patil Surname New Controversy Viral Social Media Fans)

नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गौतमीचे आडनाव पाटील नव्हे तर, चाबुकस्वार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे गौतमीने तिचे खरं आडनाव जे आहे ते घ्यावे ‘पाटील’ आडनाव लावू नये अशी भूमिका काही संघटनांकडून घेण्यात आली आहे. याशिवाय पाटील की चाबुकस्वार या आडनावावरून पुण्यात एक बैठक देखील घेण्यात आली.

गौतमी पाटील हीच्या डान्सला विरोध होत असला तरी, तिची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात वाढ आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून गौतमीच्या नावाची वेगवेगळ्या प्रकारे चर्चा आहे. तिचं नाचणं, तिचे कपडे, तिचे अंगविक्षेप, तिचं बोलणं यामुळे तिच्यावर नेहमीच टीका होताना दिसते. ज्या गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम असतो तिथे हुल्लबाजी झाली नाही असे होत नाही.

- Advertisement -

गौतमी पाटीलच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील गावकऱ्यांनी गौतमीचा कार्यक्रम असल्यास कडक धोरण अवलंबले आहे. ते म्हणजे तिचा कार्यक्रम गावात होऊ न देणे, ज्या गावात गौतमीचा कार्यक्रम असल्यास पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

याशिवाय गौतमीच्या कार्यक्रमामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी आयोजकांवर असेल अशाही सुचना काही गावकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे कोणत्या ना कोणत्या प्रकारे गौतमी चर्चेत सापडतेच. आता तर तिच्या आडनावावरुन ती चर्चेत आल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटल्याचे दिसते आहे.

दरम्यान, गौतमी कुठल्या ना कुठल्या निमित्तानं अनेकांच्या रोषाचे कारणही ठरत आहे. असे असले तरी जेवढ्या प्रमाणात तिला विरोध होतो आहे तितक्याच प्रमाणात तरुणाईचा प्रतिसादही तिला मिळतो आहे. हे सोशल मीडियावरुन, तिच्या कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीवरुन दिसून येतो आहे.


हेही वाचा – ज्यांची दुकानं बंद होतात ते एकत्र येऊन मोदींवर टीका करताहेत; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -