कोकणात ‘या’ कालावधीत समुद्राला मोठ्या लाटांची शक्यता; किनारपट्टीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोकणात (Kokan) विभागात मागील चार दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. पावसाची संततधार कायम असल्याने प्रशासनाने किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

IMD Konkan alert

कोकणात (Kokan) विभागात मागील चार दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. पावसाची संततधार कायम असल्याने प्रशासनाने किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, सततच्या पावसामुळे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत समुद्राला १४ वेळ उधाणाच्या मोठ्या लाटा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (danger the sea will be rough 60 villages in konkan will be alerted)

हवमाना विभागाच्या माहितीनुसार, १३ ते १७ जुलै व ३० व ३१ जुलै दरम्यान मोठ्या उधाणाची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शिवाय १४ वेळ उधाणाच्या मोठ्या लाटा येण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीवरील ६० गावे सागरी उधाणाच्या छायेत असल्याचा इशारा हवामान विभागाने (IMD Alert) दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मागील २ दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून समुद्र खवळलेला आहे. या पार्श्वभूमीवर समुद्रालगतच्या गावांना, वस्त्यांना स्थानिक तहसील प्रशासनामार्फत नोटिसा दिल्या जातात. मात्र, किनारपट्टीवरील नागरिकांचा मच्छीमार व्यवसाय असल्यामुळे नोटीस देऊन हे नागरिक अन्यत्र जाण्यास उत्सुक नसतात.

संभाव्य सागरी उधाणांची शक्यता असल्याने हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्हा किनारपट्टीवरील ६० गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. यामध्ये देवबाग तारकर्ली निवती, वेळागर, तांबळडेग, विजयदुर्ग, धालवलीयासह अन्य मिळून ६० गावांचा समावेश आहे.

रत्नागिरी जिल्हयातील गावखडी, हर्णे बंदर, कळंबादेवी, दाभोळे, गणपतीपुळे, मालगुंड, केळशी आंबोळगड, जैतापूर, नाटे आदी गावांचा समावेश आहे. तसेच, पावसाचा जोर कायम राहिल्यास व त्याचवेळी समुद्राला उधाण आल्यास किनारपट्टी व खाडी लगतच्या गावांमध्ये, वस्तींमध्ये उधाणाचे पाणी शिरण्याचा धोकाही वर्तवण्यात आला आहे.


हेही वाचा – मुंबईकरांसाठी स्वस्त दरात आरोग्य सुविधा पुरवणारे ‘हे’ नवे हेल्थ सेंटर सुरू होणार