घरमहाराष्ट्रDanve about CM : वंदे भारत, राम मंदिर या गोष्टी..., अंबादास दानवेंनी...

Danve about CM : वंदे भारत, राम मंदिर या गोष्टी…, अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री शिंदेंना सुनावले

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी कोकणदौऱ्यावरून परतताना वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास केला. त्यावरून भाजपा आणि ठाकरे गटात शब्दरण रंगले होते. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज, गुरुवारी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : “भाजपाला 400 जागा जिंकण्याची खात्री मग…”, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना सवाल

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा वंदे भारत ट्रेनप्रवासावरून भाजपा आणि ठाकरे गटात ट्विटरवॉर रंगले होते. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांनी काल, बुधवारी ठाकरे दाम्पत्याच्या ट्रेन प्रवासावरून टीका केली आहे. कोकण दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर येथेच्छ टीका करून मोदी गॅरंटीद्वारे तयार झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बसून मुंबईला आले, हेच यश मोदी यांचे असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येतील राम मंदिर आणि काश्मीरमधील 370 कलम हटविण्याचे काम केले. देशात 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेबाहेर काढले तर, 80 कोटी लोकांना पुढील पाच वर्षे मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे यावेळी अब की बार 45 पारचा नारा यशस्वी करून दाखवावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

हेही वाचा – Thackeray group about EC : निवडणूक आयोग हा ‘भारता’चा राहिलेला नसून…, ठाकरे गटाचे टीकास्त्र

याला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यासाहित मुख्यमंत्री शिंदे यांना देखील पोलियो डोस काँग्रेस सरकारच्या कालखंडात दिले गेले. मग तो डोस काँग्रेसने किंवा तेव्हाच्या पंतप्रधानांनी दिलेला होता का? वंदे भारत, राम मंदिर या दोन गोष्टी देशातील जनतेच्या कष्टाचे पै पै जमवून झालेल्या आहेत. महाशक्तीच्या खिशातील पैशाने नाही, हे लक्षात ठेवा, असा पलटवार त्यांनी केला आहे.

राहता राहिला प्रश्न मोफत धान्याचा. या देशातील लोक फुकट धान्य मागत नाहीत. ते आपल्या पिकाला वाजवी दाम मागतात आणि ते तुमच्या सरकारकडून होणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा – MNS : ‘पुणे की पसंत, मोरे वसंत’, वसंत मोरे यांच्या स्टेटसने पुन्हा रंगली नाराजीची चर्चा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -