Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Darshan Solanki Suicide : ४८३ पानांचे आरोपपत्र दाखल; अरमान खत्री आरोपी

Darshan Solanki Suicide : ४८३ पानांचे आरोपपत्र दाखल; अरमान खत्री आरोपी

Subscribe

 

मुंबईः Powai IIT Bombay वसतिगृहाच्या इमारतीवरुन उडी घेऊन Darshan Solanki या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी अरमान इक्बाल खत्री या आरोपीविरुद्ध मंगळवारी विशेष तपास अधिकार्‍यांनी कोर्टात ४८३ पानांचे आरोपपत्र सादर केले. आरोपपत्रात दर्शनच्या कुटुंबियांसोबत पोलीस अधिकार्‍यांचे जबाब तसेच दर्शनची सुसाइड नोट पुरावा म्हणून जोडण्यात आली आहे.

- Advertisement -

१२ फेब्रुवारी २०२३ रोजी Darshan Solanki या गुजरातच्या तरुणाने पवईतील आयआयटी वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. जातीय भेदभावाने Darshan Solanki ने आत्महत्या केल्याचा आरोप करुन त्याच्या कुटुंबियांनी पवई पोलिसांत तक्रार करुन संबधितांवर कारवाई करण्याची विनंती केली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर Darshan Solanki ला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच इतर कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती.

याच दरम्यान ३ मार्चला या गुन्ह्यांचा तपास करणार्‍या विशेष पथकाला Darshan Solanki च्या रुममधून एक सुसाइड नोट सापडली होती. त्यात त्याने अरमान खत्रीवर विद्यार्थ्यांवर गंभीर आरोप केले होते. ही सुसायट नोट हस्तलेखन विश्‍लेषणासाठी पाठविण्यात आली होती. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर ती नोट दर्शननेच लिहिल्याचे नमूद करण्यात आले होते.

सुसाईड नोट महत्त्वाचा पुरावा

- Advertisement -

सुसाइड नोटमध्ये Darshan Solanki ने त्याचा बॅचमेट अरमान खत्रीवर गंभीर आरोप केले होते. ते दोघेही आयआयटी वसतिगृहाच्या एकाच मजल्यावर राहत होते. क्षुल्लक वादातून अरमानने त्याला मारहाण करुन शिवीगाळ केली होती. या दोघांमध्ये काही चॅट झाले होते. अरमानचा Darshan Solanki आत्महत्येत सहभाग उघडकीस येताच त्याला ९ एप्रिलला विशेष पथकाने अटक केली होती. याच गुन्ह्यांत नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. मंगळवारी या संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर विशेष पथकाने स्पेशल कोर्टात अरमान खत्रीविरुद्ध ४८३ पानांचे आरोप सादर केले आहे. त्यात दर्शनचे पालक, वसतिगृहातील काही विद्यार्थी आणि पोलिसांची जबानी नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्यांत ते सर्वजण साक्षीदार आहेत. Darshan Solanki ची सुसाइड नोट आणि अरमानसोबतचे त्याचे चॅट या खटल्यात एक महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे.

दुपारी झाला होता काहीतरी पडल्याचा आवाज

Darshan Solanki आयआयटीमध्ये बी.टेकच्या पहिल्या वर्षात शिकत होता. तो १६ नंबर वसतिगृहाच्या ८०२ क्रमांक खोलीत राहत होता. तीन महिन्यांपूर्वीच तो हैदराबादरहून मुंबईत आला होता. शनिवारी परीक्षा संपल्यानंतर रविवारी त्याने वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. दुपारी अचानक वसतिगृहाच्या परिसरात काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने विद्यार्थ्यांची धावपळ झाली. त्यावेळी परिसरातील कर्मचाऱ्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत दर्शनला पाहिले. दर्शनला तात्काळ आयआयटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

 

 

 

- Advertisment -